शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे अभ्यास करून डॉ. अजय डोके यांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवले युपीएससीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 23:41 IST

मोबाइलचा योग्य कामासाठी वापर करून मुलांनी अशा परीक्षांत यश मिळवावे, असा सल्ला डॉ.अजय यांनी दिला आहे.

हुसेन मेमन -जव्हार - मंगळवारी यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील पहिले कोगदे या गावातील डॉ.अजय काशिराम डोके यांनी ३६४ वा रॅँक (All India Rank) मिळवला आहे. आदिवासी भागातून यूपीएससी परीक्षेत यश मिळवणारे डॉ. अजय डोके हे पहिलेच युवक ठरले आहेत. विशेष म्हणजे कोणताही क्लास केवळ इंटरनेटवरील व्हिडीओच्या माध्यमातून अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले आहे. मोबाइलचा योग्य कामासाठी वापर करून मुलांनी अशा परीक्षांत यश मिळवावे, असा सल्ला डॉ.अजय यांनी दिला आहे.

डॉ.अजय यांच्या या यशात त्याचे वडील काशिराम डोके व त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. बालपणापासूनच अजय यांची कुशाग्र बुद्धिमत्ता होती. त्यांना वाचनाचे, लेखनाची आवड होती. अभ्यासाच्या जोरावर चांगले गुण मिळाल्याने अजयचा ब्रम्हाव्हॅली येथे ६ वी इयत्तेत प्रवेश निश्चित झाला. ब्रम्हा व्हॅली येथील शालेय प्रवेश हाच अजयच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला. तेथे ६ वी ते १२वी पर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. पुढे उच्च माध्यमिक शिक्षण घेताना विज्ञान शाखा घेऊन १२ वी विज्ञान शाखेत यश मिळवून के. ईम. वैद्यकीय महाविद्यालय, मुंंबई येथून एमबीबीएससाठी प्रवेश घेऊन त्यांनी डॉक्टर डिग्री संपादन केली. तेथे राहत असतानांच अजयने युपीएससी परीक्षा दिली होती. संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा कोणताही क्लास न लावता यश मिळवले आहे.

मी युपूएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांना एव्हढेच सांगू इच्छितो की, आज कोणत्याही प्रकारचे क्लास न लावताही केवळ इंटरनेटच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. आपल्या ग्रामीण भागातील मुलांनीही मोबाइल, लॅपटॉपचा योग्य वापर केला तर कमी खर्चात गरीब मुलांनाही युपीएससी पास होणे अशक्य नाही.डॉ. अजय डोके, जव्हारग्रामीण आदिवासी भागांत चमत्कार झाल्यासारखी गोष्ट आहे. या विद्यार्थ्याने केलेल्या यश संपादनतेवर बोलण्यासाठी शब्द नाहीत. डॉ.अजय डोके यांनी देशातील सर्वोच्च परीक्षेत यश संपादन केल्याचा आनंद आहे.- डॉ. हेमंत सवरा,खासदार

 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाpalgharपालघर