शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:44 PM

निधीअभावी रखडलेल्या या सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

मीरा रोड : मीरा - भार्इंदरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अर्थात विपश्यना व बहुउद्देशीय केंद्र बांधण्यासाठी लागणाऱ्या ३० कोटी रूपयांपैकी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात साडेतेरा कोटींचा निधी मंजूर केला असून महापालिका दीड कोटी खर्च करणार आहे. यामुळे निधीअभावी रखडलेल्या या सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.मीरा- भार्इंदरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र व्हावे अशी मागणी सरनाईक यांनी सरकारकडे सातत्याने चालवली होती. बेवर्ली पार्क भागातील नियोजित न्यायालय इमारतीजवळ असलेली तीन हजार ८०० चौरसमीटर सकारी जमीन मंजूर करण्यात आली आहे. महापालिकेने खासगी संस्थेकडून प्राथमिक प्रस्ताव तयार करून घेत त्यासाठी ३३ कोटी ६० लाख रूपयांचा खर्च असल्याचे अपेक्षित धरले होते. तळघर, तळमजला अधिक तीन मजले असे हे केंद्र होणार असून यामध्ये विपश्यना केंद्र , मंगल कार्यालय , प्रदर्शन सभागृह , मिनी थिएटर , वाचनालय , ग्रंथालय आदी सुविधा असतील. शिवाय डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावरील जीवनपट साकारला जाणार आहे.परंतु महापालिके कडे पैसे नसल्याने हे केंद्र सरकारच्या माध्यमातून बांधण्यासाठी सरनाईक यांनी सामाजिक न्याय विभाग व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. या संदर्भात चार दिवसांपूर्वीच सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या दालनात एक बैठक झाली होती. या बैठकीला अवर सचिव अनिल अहिरे, आ. सरनाईक, पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, नगरसेवक अनंत शिर्के उपस्थित होते. बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनी यासाठी येणाºया खर्चापैकी राज्य सरकार पहिल्या टप्प्यात १३ कोटी ५० लाख तर पालिका दीड कोटी खर्च करणार असा निर्णय घेतला. तसेच हे स्मारक पूर्ण झाल्यावर याच्या देखभालीची जबाबदारी मीरा-भार्इंदर पालिकेवर निश्चित केली. त्यामुळे निधीअभावी रखडलेल्या केंद्राचा मार्ग मोकळा झाला आहे.श्रेय लाटण्यासाठी करतील आटापिटासरकार दरबारी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आंबेडकरी जनतेची इच्छा पूर्ण होईल, असे आमदार सरनाईक म्हणाले.याचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारेही आटापिटा करतील, असा चिमटा प्रताप सरनाईक यांनी भाजपाचे नाव न घेता काढला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरmira roadमीरा रोड