शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

वसई जवळच्या नायगाव खाडी रेल्वे पुलाला मोठ्या जहाजाची धडक; जहाजाला जलसमाधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 10:33 AM

drager sinks after hitting naigaon railway bridge: रेल्वे पुलाच्या खालून बेकायदेशीररित्या जहाजाची (ड्रेझर) चोरीछुपे  वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस

वसई: मुंबई व गुजरातला जोडणारा अतिशय महत्त्वाचा अशा एकमेव रेल्वे पुलाच्या खालून बेकायदेशीररित्या जहाजाची (ड्रेझर) चोरीछुपे  वाहतूक सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. वसई जवळच्या नायगाव रेल्वे पूलाला एका मोठ्या जहाजाने धडक दिली असून  या धडकेत रेल्वे पुलाच्या दोन पिलरमधील मधल्या भागांचं बऱ्यापैकी नुकसान झालं आहे. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. (drager sinks after hitting naigaon railway bridge)एक भला मोठा ड्रेझर दोन पुलाच्या खालून पास होताना पुलाला धडकला. यामुळे रेल्वे पुलाला  काही ठिकाणी तडे गेलेले आहे तर काँक्रिटचा भागदेखील मोठ्या प्रमाणावर निखळून पडला आहे. जवळपास अर्धा ते एक फुटाचं काँक्रिट या अपघातात निघालं आहे. तर ही घटना घडल्यानंतर ड्रेझर हा पूर्णपणे पाण्यात बुडाल्याचे समजते. दोन दिवसांनंतरही ड्रेझर पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आहे. हा ड्रेझर जवळपास ५० फूट लांब आणि २० ते २५ फूट रुंद असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. आतापर्यंत तीन वेळा अशा प्रकारची घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. याआधी २०१४ मध्येही असाच मोठा अपघात येथे घडला होता. मात्र हे ड्रेझर  नेमके येतात कुठून? व ते जातात कुठे? आणि यांना  नेमकी परवानगी आहे का ? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. दरम्यान या धक्कादायक घटनेने रेल्वे पुलाचा बऱयापैकी काही भाग तुटल्याने या पुलाची तात्काळ  पाहणी करून तो कितपत निकामी झाला आहे हे पाहावं लागणार आहे. नायगाव रेल्वे पूल म्हणजे मुंबई व गुजरात राज्यांना जोडणारा दुवा!परिणामी  ज्या ठिकाणी या पुलाचा  भाग तुटला आहे त्यावरून दररोज शेकडो फेऱ्या लोकल ट्रेनच्या होत आहेत. हा पूल मुंबई व गुजरातला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या रेल्वे पुलावरून दररोज लोकल व एक्स्प्रेस गाड्या गुजरात ते मुंबई असा प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला आता तांत्रिक व सुरक्षितता म्हणून  योग्य पाहणी करून अहवाल सादर करावा लागणार आहे.