विक्रमगड : पावसाच्या हुलकावणीमुळे दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकºयाला बांधावर लावलेल्या तुरींनी आधार दिला आहे. दुष्काळामुळे शेतकºयाचे कंबरडे मोडले असतांना शेतमजुरही रोजगारा आभावी भरडला गेला आहे. त्यामुळे स्थलांतराची समस्या भीषण बनली असताना बांधावरील तुरींनी बहर घेतल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या वर्षी तालुक्यांतील खरीप तुरीची ४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली असून १.५ ते २ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पन्न शेतकºयाला मिळाले आहे असल्याची माहिती तालुका कृषी पर्यवेक्षक रविंद्र घुडे यांनी दिली.
परतीच्या पावसाने ओढ दिल्याने भात पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. त्यातच भर म्हणजे या वर्षी रब्बी पीके ही संकटात असून. शेतकरी दुहेरी कात्रीत सापडलेला असतांना केलेली तुरीची लागवड कामी आली आहे. भात पिक हातून गेले असतांना ही रब्बी हंगामात या वर्षी थंडी चांगली असल्याने खरीप हंगामात लागवड केलेली तूर चांगलीत बहरली आहे. बाजारात यंदा तुरीचे भाव चांगलेच चढे असताना तुरीला बहर आल्याने शेतकºयांना फायदा होणार आहे.
दरवर्षी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आंतरपीक म्हणून तुरीचे उत्पन्न घेण्यासाठी कृषी विभागाकडून शेतकºयांना प्रोत्साहित करण्यात येते. तुरीतील पोषक घटकांमुळे कुपोषणावरही मात करण्यास मदत होत असते. त्यामुळे विक्र ामगड तालुक्यात अतिरिक्त डाळीची विक्री करून त्याचा आर्थिक फायदा घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले गेले होते.
तालुक्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यातून येणारे उत्पन्न अत्यंत मर्यादित स्वरूपात असते. काही शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असले तरी केवळ भातशेतीवर अवलंबून राहणे त्यांनाही आता कठीण होऊन बसले आहे. त्यात भात शेती मध्ये उत्पादन खर्च जास्त तर परतावा कमी मिळत असल्याने काही शेतकºयांनी यंदा बांघावरील तुरीची लागवड केली होती.
गेल्या पाच सहा वर्षापासून शेतकºयांना तूर, कडवेवाल, हरभरा, उडीद लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन त्यांना उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचा फायदा येथील शेतकºयांना होतांना दिसू लागला आहे. याचा परिणाम तुरीची लागवड वाढण्यात होईल.
तालुक्यात भरड धान्याच्या लागवड क्षेत्रामध्ये दुपटीने वाढ करण्यासाठी तूर, मूग, उडीद या पिकांचे उत्पन्न घेण्यास शेतकºयांना कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्यात येते. जमिनीची सुपिकता व उत्पादकता वाढवणे, शेतकºयाची आर्थिक स्थिति सुधारून शेतकºयांमध्ये आत्मविश्वास जागृत करणे हा मुख्य उद्देश आहे.- रविंद्र घुडे (कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी विभाग विक्र मगड)दर वर्षी आम्ही शेताचा बांधावर, माळरानावर खरीप हंगामात तुरीची लागवड करतो. या पिकाला कमी खत लागते. त्याच प्रमाणे इतर पिकांच्या तुलनेने कमी रोग पडतात. या वर्षी पावसाचे कमी प्रमाण व दुष्काळी परिस्थिती असल्याने ६० टक्के भाताचे उत्पन्न घटले आहे. मात्र, तुरीचे पीक बºया पैकी आल्याने त्याचा आम्हाला आधार वाटतो आहे.- बबन सांबरे, शेतकरी (ओंदे, विक्र मगड)
आंतरपीक म्हणून ठरते फायदयाचीतूर लागवडीसाठी मोठी विस्तृत जागा लागत नाही. शेताच्या बांधावर, माळरानावर या पिकाची लागवड करून भातशेती करणारे शेतकरी तुरीचे आंतरपीक घेऊ शकतात. हे पिक ओसाड माळरान, बांधावर, खाचरावर घेतल्या मुळे मोठ्या प्रमाणात जागेची बचत होते. त्याच प्रमाणे या पिकावर जास्त प्रमाणात कीड-रोग येत नाहीत. खताची जास्त आवश्यकता नसते. त्यामुळे आंतरपीक म्हणून याची लागवड केल्यामुळे भातपिकाच्या बांधावर वाढणारी तण, गवत यांच्यावर नियंत्रण राहून किडींचा आणि रोगांचा प्रादूर्भाव रोखला जातो अशी माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली.