- अनिरुद्ध पाटील, बोर्डी डहाणू तालुक्ऱ्यातील ग्रामीण व शहरी अशा सर्व रुग्णालयं आणि दवाखान्यांच्या तपासणीच्या मोहिमेला प्रारंभ झाला आहे. या भेटी दरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटीं संदर्भात दैनंदिन अहवाल वरिष्ठपातळीवर पाठविण्यात येत असून आजतागायत या प्रकरणी एकाविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बोगस डॉक्टरांविरोधी कारवाई करण्यासाठी सर्व दवाखाने आणि रुग्णालयांच्या तपासणीची धडक मोहीम १५ मार्च ते १५ एप्रिल या काळात सुरू झाली आहे. तालुक्यात ग्रामीण व शहरी अशा दोन भागात तपासणीचे काम सुरू आहे. या पैकी ग्रामीण भागात येणाऱ्या आशागड, सायवण, घोलवड, गंजाड, चंद्रनगर, चिंचणी, धुंदलवाडी, तवा आणि ऐना आदि नऊ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सुमारे ७० पैकी निम्म्या खाजगी दवाखान्यांची तपासणी आजतागायत पार पडली आहे. चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत धाकटी डहाणू येथील संजय भामरे यांनी इलेक्ट्रोपॅथीची पदवी असतांना डॉक्टर नावाचा उल्लेख केल्याने त्यांच्यावर डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्ऱ्यात आला आहे. या धडक कारवाई करणाऱ्या टीममध्ये तालुका आरोग्य अधिकारी अभिजीत चव्हाण यांच्यासह उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्या प्रतिंनिधींचा समावेश आहे. पूर्वसूचना न देता ही धडक मोहीम राबविली जात असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. डॉक्टरांची पदवी आणि परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, कार्यरत परिचारिकांची पदवी किंवा पदविका महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी, दवाखान्यातील सोयी-सुविधांबाबत खातरजमा केली जात आहे. डॉक्टरांकडून योग्य पद्धतीची औषधे देण्यात येतात का ही बाब तपासण्यात येत असल्याने शासकीय रुग्णालयातील औषधसाठा खाजगीत विकणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे. दरम्यान दैनंदिन तपासणी अहवाल वरिष्ठ कार्यालयांकडे पाठविण्यात येतो. तालुक्यात गैरप्रकार आढळल्यास संबंधीताविरोधी नागरिकांनी तत्काळ तक्रार दाखल करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ‘‘ एक महिन्याच्या कलावधीत सुमारे ७० दवाखान्ऱ्यांची तपासणी करण्ऱ्यात येणार असून निम्मे काम झाले आहे. दरम्यान आतापर्यंत एका विरोधात पोलिसात तक्र ार नोंदविण्यात आली आहे.’’ - अभिजीत चव्हाण (तालुका आरोग्य अधिकारी डहाणू)
डॉक्टरांच्या तपासणीची डहाणूत धडक मोहीम
By admin | Published: April 09, 2017 12:56 AM