शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

ड्रग्ज म्होरक्या बंगळुरूमध्ये अटक, आरोपींवर मोक्कांंतर्गत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:59 AM

वसई आणि तलासरी येथे पकडलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीच्या म्होरक्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या साथीदारासह बेंगलोर येथून तब्बल २७ दिवसांच्या अथक प्रयत्नाने ताब्यात घेतले.

शशी करपे वसई : वसई आणि तलासरी येथे पकडलेल्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या अंमली पदार्थांची तस्करी करणा-या टोळीच्या म्होरक्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या साथीदारासह बेंगलोर येथून तब्बल २७ दिवसांच्या अथक प्रयत्नाने ताब्यात घेतले.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ सप्टेंबर २०१७ रोजी वसईत तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून २१ लाख ७० हजार रुपये किंमतीचे ईपीड्रीन नावाचे अंमली पदार्थ जप्त केले होते. एका नायजेरीयन सह तीन इसम सदर अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन जात असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. अंमली पदार्थाचा साठा आलिशान आॅडी गाडीतून नेला जात होता. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तलासरी पोलीस ठाण्याच्या दापचरी दुग्ध प्रकल्पातील एका फॉर्म हाऊसवर छापा घातला होता. त्यावेळी पोलिसांनी एका फॉच्युनर गाडीतून ५ किलो २५० ग्रॅम हिराईन आणि २४ किलो ६९० ग्रॅम वजनाचे आयसोसॅफरॉल जप्त केला होता. त्यावेळी याठिकाणी अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य, दोन मशीन जप्त केली होती. या कारवाईत पोलिसांनी अंमली पदार्थासह कंपनीतील ४० कोटीचा माल जप्त केला होता. यावेळी प्रमुख सूत्रधार फैय्याज अहमद रसूल शेख आणि त्याचे दोन साथिदार यात गुंतले असल्याची माहिती हाती लागली होती.फैय्याज आणि त्याच्या साथीदाराला शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी आपल्या पथकासह १० डिसेंबर २०१७ रोजी हैदराबादला पोचले होते. फैय्याज, त्याचे साथिदार आणि कुटुंबिय मोबाईल फोनवरून नेट कॉलचा वापर करीत असल्याने त्यांना पकडणे मोठे आव्हान होते. अशा स्थितीतही पोलिसांनी हैदराबाद येथे फैय्याजचा ठिकाणा शोधून काढला होता. मात्र, हॉटेल मॅनेजरने माहिती आल्याची माहिती दिल्याने फैय्याज निसटला होता.२७ डिसेंबर २०१७ ला फैय्याज बेंगलोरमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर लांगी आपल्या पथकासह त्याठिकाणी तळ ठोकून बसले होते. अखेर तब्बल २७ दिवसांनी २२ जानेवारी २०१८ ला फैय्याज आणि त्याचा साथिदार साजीद शेख बेंगलोरमधील जयनगर परिसरात पोलिसांच्या हाती लागला. त्याआधी फैय्याजचा भाऊ रियाज अहमद रसुल शेख याला १२ आॅक्टोबर २०१७ रोजी वसईतून अटक करण्यात आली होती.फय्याजविरोधात माणगाव, हैदराबाद, अहमदाबादमध्ये गुन्हे दाखलवसई आणि तलासरी येथे पकडण्यात आलेल्या ड्रग्जच्या टोळीचा म्होरक्या हाती लागल्याने अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास सुरुवात झाली आहे. फैय्याजविरोधात रायगड जिल्ह्यातील मानगाव, हैदराबाद आणि अहमदाबाद येथे अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.ड्र्ग्जप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. २७ दिवसांनी २२ जानेवारी २०१८ ला फैय्याज आणि त्याचा साथिदार साजीद शेख बेंगलोरमधील जयनगर परिसरात पोलिसांच्या हाती लागला.गुन्ह्याचा तपास सुरु असताना आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तलासरी पोलीस ठाण्याच्या दापचरी दुग्ध प्रकल्पातील एका फॉर्म हाऊसवर छापा घातला होता. त्यावेळी याठिकाणी अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य, दोन मशीन जप्त केली होती.

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrimeगुन्हाArrestअटक