शौकत शेखडहाणू : पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आणि नैसर्गीक सौदर्यतेने नटलेले डहाणू शहर नगरपरिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून स्वच्छ डहाणू सुंदर डहाणू केवळ कागदावरच उरले आहे.या नगरपरिषदेची स्थापना ३१ मे १९८५ रोजी झाली त्यावेळी पहिले नगराध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दादीशेठ इराणी हे विराजमान झाले. नगरपरिषद स्थापन झाल्याने येथील लोकांच्या अपेक्षा वाढल्या, गेल्या पंचवीस ते तीस वर्षात शासनाच्या विविध योजनेअंतर्गत शेकडो कोटी रूपये विकासकामांवर खर्च झाले. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच दिसून येते. डहाणू शहरात जागोजागी भिकाºयांचे अड्डे असून स्टेशनच्या बाहेरील रस्त्याच्याकडेला कडधान्य भाजीपाला फळे, फुले, हातगाडीवाले तसेच कपडे विक्रते बसल्याने दिवसभर वाहतूक कोंडी होत असते. तर रस्ता ओलांडणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखी परिस्थिती आहे. या परिसरात रस्त्यावरच मोटारसायकल, चारचाकी, रिक्षा उभ्या राहत असल्याने नागरीकांचा जीव गुदमरतो आहे. शिवाय डहाणू-सागरनाका येथे नुकतेच शासनाच्या वैशिष्ठयपूर्ण योजनेत तीन, चार कोटी रूपये खर्च करून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे. परंतु सागरनाका ते सरावलीपर्यंत जागोजागी बंद व नादुरस्त वाहने गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याच्याकडेला पडून आहेत. तर भंगारवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यमार्ग अरूंद होऊन अनेक अपघात घडत आहे. मात्र हे अतिक्रमण व काही बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे तर सोडा. परंतु त्यांना नोटीसा पाठविण्याचेही धाडस नगर परिषद करत नसल्याने शहराला बकालपणा प्राप्त झाला आहे.दरम्यान गेल्या अनेक वर्षात डहाणू नगरपालिकेला शासनाच्या दलित वस्ती, आदिवासीवस्ती योजनेअंतर्गत कोटयावधीचा निधी प्राप्त झाला. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे म्हणजेच ज्या पाडयात पन्नास टक्के पेक्षा जास्त लोकवस्ती दलित व आदिवासी आहे, त्या ठिकाणी खर्च करण्याचे सोडून पालिका प्रशासनाने इतर ठिकाणी विकासकामांवर खर्च केल्याने आजही डहाणू नगरपरिषदेच्या दामूपाडा, लोणीपाडा, चिमाजीपाडा, संजयनगर, आंबेमोश या वस्त्या विकासापासून वंचित आहेत. डहाणू नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अद्यापही घनकचरा व्यवस्थानाचा प्रश्न सुटलेला नाही. येथील दररोज जमा होणाºया घनकचरा साठी डंपिंग ग्राऊंड नसल्न्याने दररोज येथील निर्माण होणाºयाा कचरा मिळेल त्या ठिकाणी टाकला जातो. त्यामळे शहरात मोठया प्रमाणात मच्छरांचा उपद्रव निर्माण झाला आहे.
पालिकेच्या अनास्थेमुळे स्वच्छ डहाणू कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:15 AM