बोर्डी : ईदच्या मुहूर्तावर तालुक्यात झालेल्या पहिल्या पावसाच्या आगमनाने सर्वत्र अल्हाददायी वातावरण निर्माण केले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणातील गारव्यामुळे दिलासा मिळाला. दरम्यान रविवारपासून पेरणीच्या हंगामाला प्रारंभ होणार असून किनारी पर्यटन बहरण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.जूनचा पंधरवडा उलटला तरी पावसाने हजेरी लावली नव्हती. शुक्र वारच्या मध्यरात्री पासून पावसाला प्रारंभ झाला असला तरी शनिवार, १६ जूनच्या पहाटेपासून जोराच्या वाऱ्यासह झालेले आगमन पूर्ण ताकदीनिशी होते. दुपारनंतर उघडीप मिळाल्याने रविवारी पेरणी योग्य वातावरण असेल असा विश्वास शेतकºयांनी व्यक्त केला आहे. साप्ताहिक सुट्टी असल्याने या कामाला वेग येईल. शिवाय उकाड्याने हैराण झाल्याने उन्हाळी पर्यटनाकडे पाठ फिरलेले पर्यटक किनाºयावर येऊन पावसाची मजा लुटतांना पहावयास मिळेल, त्याचा फायदा स्थानिक हॉटेल व्यावसायिक आणि विक्र ेत्यांना होईल.दरम्यान ईदच्या सुट्टीत पहिल्या पावसाचे आगमन झाल्याने बच्चेकंपनींनी भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. तर या सणाच्या शुभेच्छांसह सोशलमीडियावर पावसाचा आनंद शेअर करणारे संदेश फिरत होते. या हंगामात निरंक असलेला पावसाच्या टक्केवारीचा तक्ता आजच्या पावसाने गतिमान झाला. तर मान्सून पूर्व कामं पूर्ण केल्याचा महावितरणचा दावा मात्र फोल ठरताना दिसला. या कालावधीत विजेचा लपंडाव अव्याहत सुरु होता.>तलासरीत सरीवर सरीअनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने तलासरीत शनिवार सकाळपासून दमदार हजेरी लावल्याने भागातील शेतकरी आनंदाने कामाला लागला असून दावणीला बांधलेले बैल नांगराला जुंपून पेरणीला सुरु वात केली आहेपहाटे परिसरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या नंतर सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली. त्यांत काही वेळ सोसाट्याच्या वाºयासह पाऊस कोसळल्याने नागरिकांची चांगलीच त्रेधा तिरपीट उडाली. पाऊस सुरू झाल्याने शेतकºयाने आपल्या मोकाट सोडलेल्या गुराचाही शोध सुरू केला आहे.
ईदच्या मुहूर्तावर पावसाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 2:03 AM