शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

माकपच्या बालेकिल्ल्याने दिली कमळाला पसंती, डहाणू विधानसभेचा रागरंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 3:02 AM

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचारात कंबर कसली असली तरी डहाणू विधानसभेच्या निकालानंतर मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे.

- शौकत शेखडहाणू : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी प्रचारात कंबर कसली असली तरी डहाणू विधानसभेच्या निकालानंतर मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी डहाणू विधानसभा मतदार संघात ५८.९८ टक्के मतदान झाले. डहाणू विधानसभेत एकुण मतदान १,४९,२११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना ४९,१८१ येवढी सर्वाधिक मते मिळाली असून डहाणू विधानसभेत भाजपा अव्वल स्थानी आला आहे.विशेष म्हणजे माकपचा बालेकिल्ला असलेल्या डहाणू तलासरीतून किरण गहला यांना ४२,५१७ मते मिळवत दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेचे श्रीनिवास चिंतामण वनगा यांना डहाणू, तलासरीतुन ३८,७७८, मते मिळाली आहेत. त्यामुळे डहाणूत शिवसनेला तिसºया स्थानावर समाधान मानावे लागले, काँग्रेसचे दामु शिंगडा यांना ५९५५ मते मिळवत चौथ्या स्थानावर तर बविआचे बळीराम सुकुर जाधव यांना ५४८४ मते मिळवत पाचव्या स्थानावर मजल मारली. त्या खालोखाल नोटा ला ४४६१ मते मिळाली आहेत. संदीप रमेश जाधव अपक्ष यांना १७२९ मते तर शंकर भागा बधाटे (मार्कसवादी लेनीनवादी) यांना ११०६ मते मिळाली.डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपचे स्थानिक आमदारपास्कल धनारे हे निवडून आले आहेत. त्यांना २०१४ मध्ये ४४,८४९ मते मिळाली होती. मात्र,पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या मतात ४३३२ मतांनी वाढ झाली आहे.धनारे यांचे कौशल्य अन राजपूत यांचे टीमवर्ककासा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सभा घेतली तरी फारसा फरक पडलेला दिसत नव्हता. डहाणू विधानसभेची आमदार पास्कल धनारे यांचे कौशल्य, आमदार मनिषा चौधरी, नगराध्यक्ष भरत राजपुत यांचे टीमवर्कमुळे भाजपला फायदा झालेला दिसून येत आहे.पिछाडी तरी माकपचा दबदबा कायमडहाणू तलासरी हा माकपचा गड मानला जातो. माकपला डहाणु विधानसभेतुन ४२५१७ मते मिळवत दुसरा क्र मांकावर पोचत माकपचा गड कायम ठेवला आहे. लाँग मार्चचा फायदा होईल असा अंदाज होता.२०१४ मध्ये २८१४९ मते मिळाली होती. मात्र यावेळी १४ हजार ३६८ मते वाढली आहेत.शिवसेना सातवरून३० हजारांवरडहाणू विधानसभेत शिवसेनेचे फारसे प्राबल्य नसले तरी श्रीनिवास वनगा यांना डहाणू विधानसभेतून मोठ्या प्रमाणात मतदान झाले. २०१४ मध्ये शिवसेनेला ७८४७ मते मिळाली होती. मात्र, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनवच्या मतांमध्ये ३०९८१ मतांनी भरघोस वाढ झाली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार