शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

वसईत महापूर! अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली, अनेक गाव पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 7:51 AM

वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोर धरला आहे.

पारोळ - वसई तालुक्यात दोन दिवसापासून पडणारा पाऊस, समुद्राची भरती, व तानसा धरणाचे पाणी या मुळे वसई पूर्व भागात पूरस्थिती निर्माण झाली असून तानसा नदीच्या काठावरील पारोळ, शिरवली, सायवन, उसगाव, चांदीप,घाटेघर, कोपर, नवसई, भाताणे, खानीवडे, खारट तारा, मांडवी, या गावात पुराचे पाणी आले असून, घरात पाणी जाऊन या भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर शिरसाड अंबाडी मार्ग पाण्याखाली गेल्याने ग्रामीण भागाचा वसई, विरार, नालासोपारा शहराशी संपर्क तुटला आहे

वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोर धरला आहे. पावसाने शनिवारी जोरदार हजेरी लावल्याने दिवसभर वसईत धुमशान सुरू होते. दरम्यान, वसईतील नवघर- माणिकपूर शहरातील बहुतेक सखल भागासह रस्त्यावरही पाणी साचल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. आजही वसईत पावसाचा जोर कायम आहे. या पावसाचा फटका येथील वाहतुकीवर व वाहनचालकांना बसला. त्यातच शहरातील मुख्य चौक भागातील सिग्नल यंत्रणा बंद झाल्याने येथील कोंडीत अधिकच भर पडली. किंबहुना रस्त्यावर खड्डे व त्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन दिवसात वसईत सरासरी १५० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. शुक्रवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा वसई बुडाल्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यात विजेचा खेळखंडोबा अधूनमधून सुरूच होता. जून-जुलै महिन्यात वसईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसईत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांतीही घेतली होती. मात्र आता पुन्हा पावसाचे दमदार आगमन झाले आहे.वसई-विरारमधील अनेक सखल भागात पाणी साचले होते. अनेक इमारतींच्या आवारामध्ये पाणी साचले होते. वसई पश्चिमेकडील माणिकपूर, पार्वती क्रॉस, चुळणे गाव, उमेळमान, कौल सीटी, साईनगर, डीजी नगर, समतानगर, वसई पूर्व, गोखीवरे, वालीव, औद्योगिक पट्टा, मिठागरे वसाहत, ग्रामीण व पश्चिम पट्टीतही बºयापैकी पाणी भरले होते. नवघर माणिकपूरमध्येही तळमजल्यावरील घरे, दुकानात पाणी शिरले होते.

टॅग्स :RainपाऊसMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेट