लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : मागील चार दिवस व पुन्हा दोन दिवसापासून सातत्याने पडणाऱ्या अतिवृष्टी वादळी वाऱ्यामुळे वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मासवण पंपिंग स्टेशन व धुकंटन फिल्टर प्लांट मधील वीज खंडित असल्याने शहराला पाणी पुरवठा बुधवारी करता आला नाही
याउलट उद्या दि 22 जुलै रोजी ही जिल्ह्यात पावसाची स्थिती अशीच राहिल्यास वसई विरार ला पाणी पुरवठा हा अनियमित व कमी प्रमाणात केला जाणार असल्याची माहिती वसई विरार महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्याने लोकमत ला दिली. तसेच पुढील दोन दिवस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखिल पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आले आहे
या संदर्भात अधिक माहिती देताना वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या पालघर तालुक्यातील मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट येथे बुधवार दि 21 जुलै राजी सकाळपासूनच जोरदार वारा, वादळ,वीज गराडा सह अतिवृष्टी होत असल्याने येथील मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट भागांतील म.रा.वि.म.(MSEB) चा विद्युत पुरवठा हा दिवसभर विविध वेळेत खंडित होत होता
यात तो बुधवारी सर्वप्रथम सकाळी 07:05 ते सकाळी 07:15 ,सकाळी 07:45 am ते सकाळी 08:00 , तसेच पुन्हा संध्या 06:10pm ते संध्या.06:25pm , संध्या 07:00pm ते संध्या 07:45pm, आणि थेट रात्री 08:35pm ते रात्रीचे 11:00pm झाले तरिही हा विद्युत पुरवठा चालू झाला नाही,असे पाणीपुरवठा विभागाने सांगितले
दरम्यान बुधवारी दिवसभर वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्यामूळे शहरात बुधवार दि 21 जुलै व उद्या गुरुवार दि 22 जुलै रोजी होणारा पाणी पुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे अशी ही विनंती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे