वसई : पाचूबंदरच्या चौपाटीवर आणि तिवरांच्या ठिकाणी झालेल्या अतिक्र मणांविरु द्धची महापालिका आणि महसूल यांची बुधवारी होणारी संयुक्त मोहीम अखेर पोलीस बंदोबस्ताअभावी बारगळली. पुरेसा बंदोबस्त न मिळाल्यामुळे ही मोहीम राबवता आली नाही. मात्र, ९ मार्चनंतर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होईल, त्यावेळी ही मोहीम सुरू करून तक्र ारदारांनी निदर्शनास आणलेल्या सर्व अतिक्र मणांवर कारवाई केली जाईल, असे तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.वसईच्या पाचूबंदर येथील चौपाटीवर आणि लगतच्या मच्छिमारांच्या सार्वजनिक वापराच्या जागेवर काही खासगी इसमांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी मच्छिमारांच्या वापराचे क्षेत्र आक्र सले असून याविरु द्ध वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्था गेल्या तीन वर्षांपासूनतक्रारी करत आहे. अतिक्र मणांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अतिक्र मण करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून तीन वर्षांपूर्वी केवळ चार अतिक्र मणे असलेल्या ठिकाणी आता चाळीसहून अधिक अतिक्र मणे दिसू लागली आहेत.या शिवाय काहींनी तिवरांवर भराव करून कांदळवनाची नासधूस केली आहे. या प्रकरणी कारवाईच्या बाबतीत महापालिका आणि महसूल या दोन्ही यंत्रणा बराच काळ एकमेकांकडे बोट दाखवत हात झटकण्याचा प्रयत्न करत होत्या. आता दोन्ही यंत्रणांनी संयुक्तपणे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून ६ मार्च हा दिवस या ठिकाणच्या अतिक्र मणांवर पोलिसांच्या संरक्षणात कारवाई करण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. मात्र, महसूल किंवा पालिका यापैकी कोणीही पाचूबंदरात कारवाईसाठी फिरकले नाही.यासंदर्भात तहसीलदार किरण सुरवसे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पोलीस बंदोबस्त न मिळाल्यामुळे कारवाई होऊ शकली नाही. आपण स्वत: पोलिसांच्या संपर्कात आहोत. ९ मार्चनंतर पोलीस बंदोबस्त उपलब्ध होऊ शकेल. त्यानंतर आपण पाचूबंदरातील अतिक्र मणांवर कारवाई करू.’दुसरीकडे, महापालिकेने पाचूबंदरातील अतिक्र मण विरोधी मोहिमेची पूर्ण तयारी केलेली आहे. महापालिकेची माणसे दुपारपर्यंत महसूलमधील कर्मचाऱ्यांसह पोलीस ठाण्यात होती.दहावीच्या परीक्षा सुरू असल्यामुळे पुरेसे पोलीस बळ उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे मोहीम पुढे ढकलली आहे. पाचूबंदरच्या अतिक्र मणांवर कारावाई होणारच, अशी माहिती प्रभाग समिती ‘आय’चे सहाय्यक आयुक्त वनमाळी यांनी दिली.>तेव्हा जाधव परतले आणि अतिक्रमणे वाढलीपाचूबंदरात तिवर वृक्षांची नासधूस करणाऱ्यांंवर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्याच्या कार्यवाहीस आरंभ करण्याचे निर्देश प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिले आहेत. या कामी प्रांताधिकाºयांनी वसईचे मंडळ अधिकारी जाधव यांना नियुक्त केले आहे. मात्र, जाधव यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्र ारदार वसई मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाºयांंना संशय आहे.कारण गेल्यावर्षी पाचूबंदरात केवळ चार अतिक्र मणे असतानाच पोलिसांसह फौजफाटा घेऊन कारवाईसाठी आलेले जाधव अतिक्र मण करणाºयांंबरोबर ‘अर्थ’पूर्ण बोलणी झाल्यावर कारवाई न करताच परतले होते. त्यानंतर येथे आज चार अतिक्र मणांच्या जागी चाळीसहून अधिक अतिक्र मणे झाली असून आता कारवाई झाली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे संस्थेचे चेअरमन संजय कोळी यांनी सांगितले.
पुरेसा बंदोबस्त न मिळाल्याने अतिक्रमणविरोधी मोहीम ढूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 11:56 PM