विक्रमगड : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावपाड्यांसह मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतस्तर, आणि इतर यंत्रणेवर आहे. १०० दिवस पुरेल एवढे काम मंजूर करून ‘मागेल त्याला काम’ या ब्रीदवाक्याने तालुक्यातील ४३ ग्रा.पं.पैकी, जवळ -जवळ सर्व ग्रामपंचायतीत रोजगार हमीची कामे सुरू आहेत.
डोल्हारी खु, सवादे, कासा, दादडे, बोराडे, मोहोआंबेघर, खडकी जाांभा, कुंज, खुुंडेद, वेहेलपाडा या ग्रामपंचायतीअंतर्गत मैैैदान सपाटीकरण करणे, बंधारे - गाळ काढणे, घरकूल, गायगोठा अशी एकूण ५९ कामे सुरू आहेत. तर तालुुका कृषी १५, फॉरेस्टची ४० तर सार्वजनिक बांंधकामची १९ कामे अशी एकूण १४२ कामे तालुक्यात सुुरू असून चार हजार सहाशे त्र्याऐंशी लोकांना रोजगाार मिळाला आहे. यात ग्रामपंचायतीअंतर्गत २१३४ तर इतर यंंत्रणेकडूून २५५१ लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.तालुक्यात अजून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कामे सुरू करणे आवश्यक असताना मात्र कामे सुरू होत नाहीत, त्यामुळे मजुरांना स्थलांतर करावे लागते आहे. शेतीची कामे संपली आहेत आणि मजूर रोजगाराच्या शोधात आहे. वेळेत कामे सुरू झाली तरच मजुरांचे स्थलांतर होणार नाही आणि रोजगार हमीची कामे देखील होतील. ग्रामपंचायत स्तरावर रस्त्याची कामे बाकी असून ती सुरु करण्याची मागणी लोकांनी केली आहे.