पारोळ : वसई पूर्व भागाला पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत असल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान ग्रामस्थ जाब विचारण्याच्या तयारीत असल्याने पाणीटंचाई ही उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. शिरवली, पारोळ, उसगाव, शिवणसई, इ गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाई चा सामना करावा लागत आहे. काही गावांमध्ये टँकर ने पाणी पुरवठा होत असून शिरवली येथे ग्रामस्थानवर पैसे गोळा करून विहिरीत टँकर टाकण्याची वेळ आली आहे. या भागातील गावांची लोकसंख्याही मोठी असून त्या तुलनेत पाण्याचा मुबलक पुरवठा नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागते.
शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा होत नाही. यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न राबवल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. तसेच वसई विरार ला पाणी पुरवठा करणाऱ्या उसगाव धरणाच्या जलवाहिनीतून दिवसाआड ७ एम एल डी पाणी सोडले जात असल्याने तो पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. तसेच या भागातून बेसुमार टँकर उपसा होत असल्याने भूजल पातळी घटली असल्याने गावांना पाणीपुरवठा करण्यार्या विहिरींनी तळ गाठला आहे.उन्हाळा वाढल्याने झळा नागरिकांना बसण्यास सुरु वात झाली असून एप्रिल मे महिन्यात पाणी समश्या आणखी बिकट होणार आहे.तसेच याच दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी असल्याने प्रचारात दरम्यान उमेदवाराला पाणी प्रश्नावर नागरिकांना उत्तर दयावे लागणार आहे.जनता जाब विचारणारतीव्र पाणीटंचाई असताना विविध उपाययोजना राबविणे गरजेचे होते. यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष का दिले नाही. या गावांमध्ये मंजूर झालेल्या बोरवेल का मारल्या नाहीत, शासनाचा टँकर ने पाणीपुरवठा का होत नाही.या बाबत उमेदवाला जाब विचारण्याची शक्यता आहे.