विरार : वसई विरार शहरात नवीन सिग्नल बसवण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, पूर्वीपासून असलेल्या सिग्नलची महापालिकेकडून देखरेख होत नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. जकात नाक्यावरील सिग्नल वारंवार बंद पडत आहे तर, विरार पूर्वेला असलेला सिग्नल पाळला जात नाही, यामुळे सतत वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे.
विरार पश्चिम व पूर्वेला एक - एक सिग्नल बसवण्यात आला आहे. मात्र, महापालिकेकडून त्याचाही सांभाळ व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. विरार पश्चिमेला जकात नाका या मुख्य रस्त्यावर गेल्या वर्षी सिग्नल बसवण्यात आला. मात्र, त्याचे पालन व्यवस्थितरित्या केले जात नाही म्हणून बेशिस्तीचे खापर नागरिकांवर फोडले जात होते.जकात नाक्यावरील सिग्नल हा दर रविवारी बंद असतो (दोन महिन्यांनी एखादा रविवार सुरु असतो) तसेच गेल्या आठवड्यात हा सिग्नल तिसऱ्यांदा बंद असल्याची घटना घडली. खरं तर सुट्टीच्या दिवशी रस्त्यांवर ट्राफिक जॅम असते.
पूर्वी सिग्नलच्या नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक पोलीस उभे करण्यात आल्यानंतर नागरिकांकडून सिग्नलचे पालन व्यवस्थित रित्या सुरु झाले होते. नागरिकांना आता सिग्नलची सवय लागल्याने ते बंद पडल्यानंतर कधी थांबावे, कधी निघावे याचा अंदाज येत नसल्याने ते कशीही वाहने चालवतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये वाढ होत आहे.पाच ठिकाणी दुरुस्ती १५ नवे सिग्नलच्विरार पूर्वेला असलेल्या सिग्नलचे पालन होत नाही व त्याची देखरेखीसाठी वाहतूकविभागाकडे कर्मचारी नसल्याने चालक कसेही गाड्या चालवतात. सिग्नल असूनही नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो आहे. महापालिकेतर्फे ५ ठिकाणी सिग्नल व्यवस्थेचे काम सुरु आहे व १५ नवीन सिग्नल बसवण्यात येणार आहेत.च्परंतु, जे आहेत ते सांभाळले जात नाहीत. विरार पश्चिमेला असलेला एकमेव सिग्नल सतत बंद पडत असल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असला तरी यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे.
‘काही छोटे तांत्रिक बिघाड असतील, परंतु चौकशी करून आम्ही लवकरच दुरूस्त करू. तसेच वाहतूक पोलीस देखील लवकरच तैनात करू. सध्या संख्या कमी असल्याने अडचण होत आहे पण आमचे प्रयत्न सुरु आहेत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ.’- संपत पाटील, वाहतूक पोलीस अधिकारी