शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

दापचरी नाक्यावर चालकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:56 PM

कागदपत्रांसह करीत होता धावपळ : आणखी किती बळी जाणार ?

तलासरी : दापचरी तपासणी नाक्यावर सोमवारी दुपारी एका ट्रक चालकाचा बळी गेला. दापचरी तपासणी नाक्याच्या पुढे वाहनांची कागदपत्रे तपासण्यासाठी बसलेल्या आर.टी.ओ. अधिकाऱ्यांना कागदपत्रे दाखविण्यासाठी तो जात असता त्याचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला. सावता अरुण राऊत वय ३४ असे त्याचे नाव आहे.

दापचरी तपासणी नाक्यावर कर वसुलीचे काम सदभाव कंपनीला दिले आहे, त्यांचे कर्मचारी वाहने वजन काट्यावर घेऊन शासन मान्य कराच्या पावत्या देतात. यावेळी आर.टी.ओ. अधिकाऱ्यांनी केबिनमध्ये बसून वाहनांची कागदपत्रे तपासून नियमबाह्य वाहनावर कारवाई करायची असते, व हे सर्व तपासणी नाक्याच्या सीसीटीव्हीत रेकोर्ड होत असते. पण आर.टी.ओ. अधिकारी येथील केबिनमध्ये न बसता तपासणी नाक्याच्या १०० मीटर पुढे बनविलेल्या शेडमध्ये बसून कामकाज करतात, तपासणी नाक्यावर गाडी येताच सदभावचा कर्मचारी वजन करून वाहनाला कराची पावती देऊन पैसे घेतो त्याच वेळी आर.टी.ओ. अधिकाºयांनी तपासणी नाक्यावर ठेवलेले खाजगी इसम वाहन चालकाकडून गाडीच्या कागदपत्रांची फाईल घेतात. वाहन चालक वजन काट्यावरून गाडी पुढे नेऊन धावत जाऊन शेडमध्ये बसलेल्या अधिकाºयांना एण्ट्रीची रक्कम देऊन पुन्हा धावत खाजगी इसमाकडून कागदपत्रे घेऊन निघून जातो, या पध्दतीमुळे मात्र वाहन चालकाला त्रास सहन करावा लागून जीव धोक्यात घालून धावा धाव करावी लागते यात त्याचा प्रसंगी बळीही जातो. पालघर पोलीस अधीक्षकांनी काही महिन्यांपूर्वी तपासणी नाक्यावरील वाहने पास करणाºया टोळ्या व आर.टी.ओ. अधिकाºयांची खाजगी माणसे (पंटर) यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. पण त्यांची ही कारवाई आता थंड पडली आहे त्याचे कारण काय? हा प्रश्न जनतेला पडला आहे.अशा प्रकारचे जाणारे बळी थांबविण्यासाठी आवश्यक ती कारवाई होणार कधी असा प्रश्न वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.आमच्याकडे मनुष्यबळ मुबलक आहे, अधिकाºयांसाठी सुसज्ज केबिन बनविण्यात आल्या आहेत, कागदपत्रे घेण्यासाठी खिडक्याही मोठ्या आहेत. पण अधिकारी केबिनमध्ये बसत नाहीत.-सुरेंद्र गेडाम, व्यवस्थापक, सदभाव, दापचरी तपासणी नाकानियमानुसार अधिकारी केबिनमध्ये बसून काम करीत असतात. वाहने पळून जाऊ नये म्हणून अधिकारी नाक्याच्या पुढे उभे असतात, सदभावकडे मनुष्य बळ कमी असल्याने वाहनांच्या रांगा लावल्या जात नाहीत, वाहने भरधाव धावतात.- अनिल अहेर, सहाय्यक परिवहन अधिकारी

टॅग्स :AccidentअपघातVasai Virarवसई विरार