- रवींद्र सोनावळे शेणवा : निकृष्ट बांधकाम, तुटलेले कठडे, सभोवती झाडे - झुडुपे, साचलेला गाळ त्यातच झाडांचा पालापाचोळा पडून जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या विहिरीतील दुर्गंधी आणि शेवाळेयुक्त पाणी पिण्यास योग्य न राहिल्याने ढाढरे, डोंगरवाडी,उंबरवाडीतील ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागते आहे. तर ढाढरे ओहोळालगत असणारी ढोळकी विहीर प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अजूनही डागडूजीच्या प्रतीक्षेत आहे.शहापूर तालुक्यात सर्वत्र पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असताना पाण्याच्या स्रोतांचे जतन आणि संवर्धन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसते. ढाढरे गावानजीकच्या ओहोळालगतच्या अवघ्या दहा फूट खोल असणाऱ्या तसेच पाण्याचे स्रोत असून मुबलक पाणी असणाºया विहिरीकडे केलल्या दुर्लक्षामुळे येथील पाणीच पिण्यायोग्य राहिलेले नाही. विहिरीचे कठडे तुटले आहेत.परिणामी विहिरीचे पाणी गाळ साचून दूषित होत आहे. भर मे महिन्यातही पाणीसाठा असलेल्या या विहिरीकडे प्रशासनाने लक्ष दिले असते तर शेजारील गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकले असते. शिवाय कठडे तुटलेल्या या विहिरीत एखादा मनुष्य किंवा प्राणी पडून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीने या विहिरीची दुरु स्ती करणे गरजेचे आहे. केवळ दुरु स्ती-देखभालीअभावी पाणी असूनही पिऊ शकत नसल्याने स्थानिक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत आहेत.पंचायत समितीने तात्काळ या विहिरीचा पंचनामा करु न पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे.शहापूर तालुक्यात अनेक ठिकाणी गाळ साचून व मानवी चुकांमुळे नैसिर्गक जलस्रोत दूषित झाले आहेत किंवा लुप्त पावले आहेत. अशा ठिकाणी पाणीटंचाईच्या काळात तात्पुरता उपाय म्हणून टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.>पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने ग्रामपंचायतींच्या मदतीने दुषित व बंद पडलेले पाणीस्त्रोत शोधून त्यांचे पुनरु ज्जीवन करण्याची गरज आहे.- महेंद्र भेरे,सामाजिक कार्यकर्तेढोळकी विहिरीची डागडुजी केल्यास पाणी टंचाईचे प्रमाण कमी होईल. तसेच जलस्रोताचे संवर्धन केल्यास मुबलक पाणी उपलब्ध होईल.- कमळू मेंगाळ, अरविंद देशमुख, ग्रामस्थ डोंगरवाडी, ढाढरे>विहिरींमध्ये पाणी कमी असल्याने शेवाळे अधिक प्रमाणात जमा होते. त्यामुळे झºयांचे प्रमाणही कमी होते. मात्र, त्यासाठी ग्रामपंचायतीने विहिरींची स्वच्छता करणे आवश्यक आहे. - एम.बी. आव्हाड, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग
ढोळकी विहीर डागडुजीच्या प्रतीक्षेत, जलस्रोत बंद होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:23 AM