पालघर : गेले नऊ दिवस रासगरबा आणि दांडीयासह अनेक धार्मिक कार्यक्रमांनी गाजत असलेल्या नवरात्रौत्सवाची आज दुर्गामातेच्या विसर्जनाने झाली. अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात ते पार पडले. विशेष म्हणजे आज पावसाने हजेरी न लावल्याने दसºयाचा आणि विसर्जनाचा असे दोन्हीही सोहळे निर्विघ्न पार पडले.पोलिस ठाण्यात झालेले शस्त्रपूजन, शाळांमध्ये झालेले सरस्वती पूजन, शेताच्या बांधावर झालेले कृषी अवजार पूजन यामुळे दसºयाला विविधांगी स्वरुप प्राप्त झाले होते. रात्री १० वाजेच्या आत विसर्जन पूर्ण करणार मंडळांनी भर दिला होता.यंदा अनेक ग्राहकांनी दसºयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी बुकींग तत्रांने केल्याने सराफ बाजारात गर्दी कमी असली तरी व्यवहार दणक्यात झाले. दुचाकी आणि चारचाकी वाहने आणि घरे यांच्या बाजारपेठेतही तेजी दिसून आली सगळ्यात मोठा उत्साह हा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत यावेळी होता. आलिशान टीव्ही, फ्रीज आणि तत्सम वस्तूंच्या खरेदीप्रमाणेच महागड्या मोबाईललाही मोठी मागणी होती. साड्यांपासून ते गाड्यांपर्यंत सर्वच वस्तू खरेदीसाठी वित्तसंस्थांचे कर्ज मिळत असल्याने खरेदीला उधाण आले होते, अशी प्रतिक्रीया व्यापाºयांनी व्यक्त केली. देवीच्या विसर्जनाच्या मिरवणूकींसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे ते सर्वत्र शांततेत व शिस्तीने पार पडले.
दुर्गामातेला शांततेत आणि भावपूर्ण निरोप, खरेदीलाही आले होते उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 5:31 AM