वसई : पश्चिम रेल्वेवर नालासोपारा आणि वसई या दोन स्टेशनदरम्यान सर्वाधिक अपघात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते मीरा रोड दरम्यान रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या साधारण ३३ ने घटली आहे. दरम्यान, नालासोपारामधील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. परिणामी प्रवाशांना लोकलमध्ये चढणे अत्यंत जिकिरीचे आणि धोकादायक झाले आहे.वसई लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या वैतरणा, विरार, नालासोपारा, वसई, नायगाव, भार्इंदर आणि मीरा रोड रेल्वे स्थानकादरम्यान २०१९ मध्ये तब्बल २१३ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना, गर्दीतून पडून, नैसर्गिक तसेच ओव्हरहेड वायरला शॉक लागून झाले आहेत. तर यात ५६ प्रवाशांचा मृत्यू गर्दीच्या वेळी गाडीतून खाली पडून झाला आहे.नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानकादरम्यान सर्वाधिक मृत्यू झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. वैतरणा ते मीरारोडमधील स्थानकांपैकी नालासोपारा रेल्वे स्थानकातून सर्वांत जास्त प्रवासी हे दररोज प्रवास करतात. नालासोपारा परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत आहे. परिणामी प्रवाशांना लोकलमध्ये चढणे अत्यंत जिकिरीचे व धोकादायक झाले आहे. सकाळच्या वेळी कसरत करून विरारवरून डाऊन येऊन आम्हाला गाडी पकडावी लागते, असे प्रवासी वर्गाकडून सांगण्यात येते, परंतु वसई व नायगाव स्थानकांमध्ये गाडीच्या आत शिरणेच अशक्य झाल्याने दारात लटकत प्रवास करावा लागतो. यामध्ये अनेकदा प्रवासी तोल जाऊन गाडीच्या खाली पडतात. ही समस्या महिलांच्या डब्यात सर्वाधिक जाणवते. अशा घडना टाळण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना शिस्तीचे धडे अथवा अशा हुल्लंडबाजावर कडक कारवाई देण्याची गरज असल्याचे मत वसई-विरारमधील अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे.>प्रवासी नियम पाळत नाहीत!रेल्वे प्रवाशांनी रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वेतर्फे विविध उपाययोजना करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत. रेल्वे रूळ ओलांडताना २०१९ या वर्षात तब्बल ११० जणांना आपला जीव गमवला आहे. रेल्वे रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदेशीरच नव्हे तर धोकादायकही आहे. मात्र लवकर पोहोचण्यासाठी, जिने ओलांडायचा कंटाळा येतो म्हणून अनेक प्रवासी रेल्वे रूळ ओलांडतात. त्यामुळे अपघातांचेही प्रमाण वाढलेले आहे. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलातर्फे विविध मोहिमा राबविल्या जातात. रेल्वेनेही प्रवाशांच्या सोयीसाठी पादचारी पूल, सुरक्षा रक्षक जाळी, पादचारी उड्डाणपूल भुयारी मार्ग बनविले आहेत. परंतु प्रवाशांची रूळ ओलांडण्याची सवय बंद होण्याची चिन्हे दिसत नाही. दरम्यान, २०१८ मध्ये २४६ अपघाती मृत्यू आणि २०१९ मध्ये २१३ मृत्यू झाले.>वैतरणा ते मीरा रोडदरम्यानझालेले अपघाती मृत्यूजानेवारी - १०फेब्रुवारी - २०मार्च - १८एप्रिल - २१मे - १३जून - १९जुलै - १९आॅगस्ट - १९सप्टेंबर - १५आॅक्टोबर - १७नोव्हेंबर - २३डिसेंबर - १९
नालासोपारा-वसई दरम्यान परेवर होतात सर्वाधिक अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2020 1:13 AM