हितेन नाईक / पालघरवाडा येथील एका साडेसहा वर्षीय बालिकेचा बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या अतुल रामा लोटे या २८ वर्षीय आरोपीस अवघ्या ८ तासात जेरबंद करून त्या नराधमास फाशीची शिक्षा मिळवून देणाऱ्या पालघरच्या संजय हजारे या कर्तव्यतत्पर पोलीस अधिकाऱ्यास १ मे रोजी पोलीस महासंचालकांच्या हस्ते ‘सन्मान चिन्हा’ने गौरविण्यात येणार आहे.जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस येथे राहणाऱ्या आरोपीच्या वडिलांचे चिकनचे दुकान होते तर त्या दुकानातून चिकन घेऊन त्याचे भुजिंग बनवून विक्र ी करण्याचा व्यवसाय मृत पावलेल्या मुलीच्या वडिलांचा होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबीय एकमेकांच्या ओळखीचे होते. वर्ष २०१४ च्या दरम्यान वाडा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून संजय हजारे कार्यरत असताना एका साडेसहा वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दाखल केली होती. पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास केला असता काहीही धागेदोरे त्यांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांवरचा दबाव वाढत होता. शेवटी हजारे यांनी तपासाची सूत्रे हातात घेऊन तपास होती घेतला. चौकशी अंती एक शेंडीवाला मुलगा त्या मुलीला आपल्या सायकल वरून घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्या वरून पोलिसांनी तात्काळ एकाला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. अपहरण व बलात्कार केल्या नंतर ती आपले नाव सांगेल या भीतीने तिचा गळा दाबून खून केल्याचे त्याने सांगितले. तसेच गवताच्या गंजीत लपविलेला मृतदेह पोलिसांना दाखिवला. मात्र, प्रकरणात फिर्यादी आणि आरोपी हे दोन भिन्न समाजाचे असल्याने समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ पाहत असताना हजारे यांनी अत्यंत हुशारीने या परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कुठल्याही परिस्थितीत आरोपीला कडक शासन करण्याचा विश्वास पिडीत कुटुंबियांना दिला. त्यामुळे परिस्थिती निवळल्या नंतर पोलिसांनी भक्कम पुरावे आणि साक्षीदार न्यायालया पुढे हजर केले. त्यामुळे न्यायालयाने आरोपी अतुल लोटे याला फाशीची शिक्षा सुनावली.
कर्तव्यतत्पर पो. अधिकाऱ्याचा महाराष्ट्रदिनी होणार सन्मान
By admin | Published: April 29, 2017 1:18 AM