पालघर : जिल्ह्यात आज सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी आता पर्यंत झालेल्या सर्वात तीव्र (४.३ रिश्टर स्केल) भूकंपाने आपले क्षेत्र थेट पालघर, विक्रमगडपर्यंत विस्तारल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जवळपास असणाऱ्या नागरी वस्तींना याची झळ पोहोचल्याने किरणोत्सराची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
डहाणू-तलासरीपासून सुरू झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांचा सिलसिला काही थांबायचे नाव घेत नसून आता पर्यंत सुमारे ७०० च्यावर कमीजास्त तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्के जिल्ह्याला बसले आहेत. नागरिकांनी घरात न राहता शासनाने उभारलेल्या तंबूत राहावे असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.
भूकंप तज्ज्ञांनी पालघर-डहाणू या परिसरातील परिस्थिचा अभ्यास करून भूगर्भात होणाऱ्या हालचालीमुळे हे धक्के बसत असल्याचे सांगून या पुढेही ह्या धक्क्यांचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. या भूकंप प्रवण क्षेत्रातील घरे ही भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात न आल्याची काळजी जिल्हा प्रशासनाला सतावत असून आजच्या ४.३ रिश्टर स्केलच्या वाढलेल्या भूकंपाच्या धक्क्याने त्यांच्या काळजीत मोठी भर घातली आहे. त्यातच डहाणू, तलासरी या दोन तालुक्या पुरता मर्यादित असणारा हा धोका आता पालघर आणि विक्र मगड तालुक्यामध्ये पोहचल्याने आणि काही घरांना भेगा पडल्यामुळे भविष्यात या धक्क्याची तीव्रता वाढून काही अघटित घडण्याआधीच प्रशासनाला जीवित वा वित्तहानीची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाय योजना आखाव्या लागणार आहेत.
जिल्हा प्रशासन या संदर्भात तात्काळ सतर्क होऊन कामाला लागले असून एसएससीच्या परीक्षा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षणअधिकाऱ्यांनी तसेच सर्व तहसीलदार, प्रांताधिकाºयांनी विविध भागात भेटी देऊन आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे ह्यांनी दिल्याचे लोकमत ला सांगितले.पालघरमधील वेवूर येथे अनेक घरांना गेले तडेपालघर : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी झालेल्या ४.३ रिष्टर स्केल च्या भूकंपा ने आपले क्षेत्र पालघर, विक्र मगड पर्यंत विस्तारले असून पालघर मधील वेवूर येथील रानू मेंगडे ह्यांच्या घराला तडे गेल्याने संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावटाखाली वावरत आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात मागील १ फेब्रुवारीला( शुक्रवारी) जवळजवळ १६ भूकंपाचे एकापाठोपाठ एक धक्के जाणवले होते. त्यातील ६ भूकंपाची धक्क्याच्या नोंदी ३.० रिश्टर स्केलच्या नोंदविण्यात आल्या होत्या. यामधील ४.१ रिश्टर स्केलचा सर्वाधिक क्षमतेच्या भूकंपाची नोंद फेब्रुवारी महिन्यात झाली होती. त्यात दोन वर्षीय चिमुकलीने आपला जीव गमावल्याची दुर्दैवी घटना घडली होती. आज पुन्हा जोरदार भूकंपाचा धक्का बसल्या नंतर इंडियन मेट्रोलॉजीकल विभागाने ४.३ रिष्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद झाल्याचे सागितले आहे. शुक्र वारी मध्यरात्री एक वाजेपासून जवळ जवळ ६ मध्यम स्वरूपाचे धक्के बसले त्यानंतर मात्र अकरा वाजून १४ मिनिटानी आतापर्यंत सर्वाधिक मोठ्या तीव्रतेचा हा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागासह आज गुजरात राज्यातील उंबरगाव, संजाण, वापी तसेच केंद्रशासित प्रदेशातील सिल्वासा पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच डहाणू, जव्हार तालुक्यातही जाणवला. पालघर तालुक्यातील ,पालघर, बोईसर, सातपाटी, वडराई, केळवे, विक्र मगड तालुक्यात ही भूकंपाचे धक्के जाणवल्याने भूकंपाचा विस्तार वाढत असल्याने नागरिकामध्ये भीती आहे.डहाणूत ४.३ रिश्टर स्केलचा धक्काडहाणू : या तालुक्यात शुक्र वार, 1 मार्च रोजी सकाळी 11वाजून 14 मिनिटांनी 4.3 रिश्टर भूकंपाचा धक्का बसला. हा आत्तापर्यंतचा हा सर्वात जास्त क्षमतेचा धक्का असून केंद्रबिंदू 20.2 अंश व 72.8 अंशचा तर भूगर्भात 5 किलोमीटरचा होता. दहावीचा पहिला पेपर लिहिणाºयावर परिणाम झाला नाही.परंतु धुंदलवाडी, दापचरी, गंजाड आणि परिसरातील गावांमध्ये घरांना भेगा पडल्या. मात्र कुठेही जीवीतहानीची नोंद नाही. दहावीच्या वार्षिक परीक्षेचा पहिला पेपर सकाळी अकरावाजता सुरू झाला. त्यानंतर चौदा मिनिटांनी 4.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. धुंदलवाडीनजीक गांगणगाव हे सर्वात नजीकच्या परीक्षाकेंद्रावर 372विद्यार्थी पेपर लिहीत होते. त्यांना धक्का जाणवल्यानंतर काही काळ घबराटीचे वातावरण होते. मात्र तत्काळ त्यांनी स्वत:ला सावरून लिहायला सुरु वात केली. प्रशासनाने आजतागायत केलेल्या जनजागृती मोहिमेचे हे यश म्हणावे लागेल.करसुडमधील अनेक घरांना तडेविक्रमगड : गेल्या काही महिन्यांपासून पालघर जिल्हयांतील डहाणू, तलासही,जव्हार व अन्य काही तालुक्यांना भूकंपाचे हादरे बसत असतांनाच आता विक्रमगडही भूकंपाच्या रडावर आला असून तालुक्यातील वेहेल पाडयात सकाळी ११.१५ सुमारास चाबके तलावली,पाचमाड, खांड, विक्रमगड आदी ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले तर करसुड या ठिकाणी त्याची तीव्रता जास्त असल्याने येथील रतन बुध्या कोरडा, काशिनाथ अनंता तांबडा,जयराम राल्या हाडळ, नवश्या मंगळया हाडळ यांच्या घरांना तडे गेले आहेत. याबाबतची माहिती मिळताच तहसिलदार श्रीधर गालिपिल्ले यांनी पथकासह घटनास्थली जाऊन पाहाणी केली. मात्र या धक्यांमुळे जास्त हानी झाली नसली तरीही या भूकंपामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. धामणी डॅम हा विक्र मगड तालुक्यात असून तेथील आजूबाजूला असलेल्या गाव पाडयांना मागेही भूकंपाचे धक्के बसले होते तसे ते शुक्र वारी देखील बसले आहेत.भूकंपामुळे मासे पळालेपालघर : भूकंपाच्या वाढत्या धक्क्यांचा मोठा परिणाम मासेमारी व्यवसायावर होत असून या धक्क्यामुळे मच्छीचे थवे दडून बसल्याने मागील दोन महिन्यांपासून मच्छीमारांच्या जाळ्यात मासेच मिळेनासे झाले आहेत. जिल्ह्यात होणार्या ह्या भूकंपाचा केंद्रबिंदू हा डहाणू जवळील समुद्राच्या आत असून आजपर्यंत सतत झालेल्या ७०० धक्क्यांमुळे समुद्रात मोठी कंपने होत असल्याने मच्छीचे थवे दडून बसतात अथवा खोल समुद्रात जातात असे जीवशास्त्राचे प्राध्यापक प्रो.भूषण भोईर यांनी लोकमत ला सांगितले.