वसई: निवडणूक काळातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी मद्य विक्रीच्या दुकांनावर वेळेची मर्यादा घालण्यात आली असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे. वाईन शॉप आणि बिअर दुकाने रात्री साडेदहानंतर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून उपहारगृहात (परिमट रुम) मध्ये देखील साडेअकरा नंतर मद्य विक्रीला मनाई करण्यात आली आहे.सध्या लोकसभा निवडणुकी निमित्त आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. पालघर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या २९ एप्रिल रोजी होणार आहे. या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व शासकीय विभाग प्रयत्न करत आहे. आम्ही दररोज रात्री गस्त घालत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहोत, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. विजय भुकन यांनी दिली. दरम्यान २७ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ पासून मतदान प्रक्रि या संपेपर्यंत ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे.याचाच एक भाग म्हणून सर्व मद्य विक्र ीच्या दुकानांना तसेच मद्य विक्र ी करणाºया उपहारगृहांना वेळेचे बंधन घालून देण्यात आले आहे. निवडणूक निर्णयÞ अधिकाऱ्यांनी तसे आदेश पालघर जिल्ह्यातील राज्य उत्पादक शुल्क विभागाला दिले आहे. या आदेशाअन्वये मद्य विक्र ी करणारे परिमट रु म सकाळी साडे अकरा ते रात्री साडेअकरा पर्यंत, देशी बार सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत खुले ठेवता येणार आहे.वाईन शॉप तसेच बिअर शॉप सकाळी १० ते रात्री साडे पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परिमट रु म परवाना असलेल्या उपहारगृहांना रात्री साडेअकरा पर्यंतच परवागनी देण्यात आलेली आहे. २९ एप्रिल पर्यंत नियमांचे हे बंधन लागू करण्यात आलेले आहे. या वेळेच्या मर्यादेचे पालन करण्याच्या सक्त सूचन निवडणूक अधिकाºयांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिल्या आहेत.
साडेदहाला वाइन शॉप, तर साडेअकराला बार होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:28 PM