शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सर्वच पक्षांना निवडणूक आयोगाचा ‘दे धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 11:29 PM

इच्छुक उमेदवारांची धांदल : अचानक निवडणूक जाहीर

वसंत भोईर।लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम मंगळवार, १७ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने अचानकच जाहीर करत सुस्त असलेल्या सर्वच राजकीय पक्षांना एका प्रकारे धक्काच दिला आहे. यामुळे सर्वच पक्ष खडबडून जागे झाले आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका मंगळवार दि. ७ जानेवारी २०२० रोजी होणार असल्याचे आयोगाने जाहीर केल्याने सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांची धांदल उडाली असून पक्षांतर्गत अर्ज दाखल करणे, उमेदवारी निश्चित करुन पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करणे या किचकट प्रक्रिया पार पाडाव्या लागणार असल्याने इच्छुक उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.पालघर जिल्हा परिषदेसाठी वाडा तालुक्यात सहा जागा असून वाडा पंचायत समितीसाठी बारा जागांवर निवडणुका होणार आहेत. वाडा शहर हे नगर पंचायत क्षेत्र झाल्याने मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष निलेश गंधे यांचा मतदारसंघ बाद झाला आहे. तर कुडूस गट अनुसूचित जमातीसाठी राखीव पडल्याने महिला व बालकल्याण समितीच्या सभापती धनश्री चौधरी यांचाही मतदारसंघ गेल्याने त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार की नाही, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा पैकी पाच जागा इतर मागासवर्गीयांसाठी तर कुडूस गट अनुसूचित जमातीसाठी राखीव राहिल्याने राजकीय पक्षातील अनेक दिग्गज इच्छूक उमेदवारांची घोर निराशा झाली आहे. तर पंधरा वर्षातून प्रथमच संधी मिळाल्याने या गटातील कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तर काही जागांवर दुसऱ्या गटातील उमेदवारांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याने स्थानिक उमेदवार उमेदवारीसाठी इरेला पेटल्याने या निवडणुकीतही चांगलाच संघर्ष पहावयास मिळणार आहे.

विद्यमान पंचायत समितीच्या सर्वच सदस्यांचे आरक्षण बदलल्याने सर्वांचेच अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून त्यांचे पुनर्वसन होते की त्यांना नारळ दिला जातो याकडे सर्वांचे लक्ष आहे. पंचायत समितीच्या विद्यमान सभापती अश्विनी शेळके, माजी सभापती अरुण गोंड, मृणाली नडगे, विद्यमान उपसभापती मेघना पाटील, माजी उपसभापती माधुरी पाटील, जगन्नाथ पाटील, नंदकुमार पाटील आदी पदाधिकाऱ्यांचे मतदारसंघातील आरक्षण बदलल्याने त्यांच्या पुढील भवितव्यावर टांगती तलवार असल्याचे चित्र आहे.

वाडा पंचायत समितीत भाजपचे सहा, शिवसेना पाच व राष्ट्रवादीचा एक असे पक्षीय बलाबल असून सत्तेसाठी भाजप आणि राष्टÑवादीने एकत्र येत पाच वर्षे शिवसेनेला बाजूला सारून सत्ता स्थापन केली होती. मात्र शेवटचे एक वर्ष राहिलेले असतांना तडजोडीप्रमाणे राष्ट्रवादीला सभापतीपद देणे बंधनकारक असतांना भाजपने हे पद स्वत:कडेच ठेवून राष्ट्रवादीला शेवटच्या क्षणी डावलले होते. त्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत तालुक्यातील राजकारण बºयाच अंशी ढवळून निघाल्याने व वाडा नगर पंचायती सारख्या महत्त्वाच्या निवडणुकीतून जनतेतून थेट निवडणूक होऊन शिवसेनेच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर या निवडून आल्या होत्या. त्यांनी भाजप उमेदवार, तत्कालीन पालकमंत्री विष्णू सवरा यांची कन्या निशा सवरा यांचा पराभव केला होता. यामुळेच सध्याच्या राजकीय घडामोडी पहाता पंचायत समितीत कोणाची सत्ता येते, याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत.

निवडणूक कार्यक्रम कमी कालावधीचा असल्याने उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रचारासाठी कमी वेळ मिळत असल्याने उमेदवार मतदारापर्यंत कसा पोहोचू शकेल, असा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. तर कमी कालावधीत प्रचार यंत्रणा कशी राबवावी, याच्या नियोजनात सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान, बुधवारी सर्वच पक्षांच्या पक्ष कार्यालयात तातडीच्या बैठका घेऊन इच्छूक उमेदवारांना पक्षाच्या वतीने अर्ज वाटप करून ते लगेचच पक्षाकडे जमा करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत. या अर्जांची पडताळणी करुन योग्य उमेदवाराला उमेदवारी देणे हे सर्वच पक्षांसाठी आव्हान असणार आहे. उमेदवारीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढू नये याची खबरदारीही वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे. एकेका जागेसाठी प्रत्येक राजकीय पक्षातूंन दहा ते बारा इच्छुक उमेदवार आहेत.

कागदपत्रे मिळवण्यासाठी उमेदवारांची कसरतच् या निवडणुका फेब्रुवारीमध्ये होतील असा अंदाज असतानाच अचानक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने उमेदवारांची झोप उडाली आहे.च्१८ ते २३ डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख असल्याने राखीव असलेल्या मतदारसंघांतून लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना कागदपत्रे मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.