डहाणू : १३ डिसेंबर २०१७ मध्ये डहाणू नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत असून ती येथील सर्वच राजकीय पक्ष लढविणार असल्याने प्रतिष्ठेची होणार आहे.सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या नगरपरिषदेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा झेंडा फडकविण्याचे पालकमंत्री विष्णू सवरा, खासदार चिंतामण वनगा, आमदार पास्कल धनारे यांचे स्वप्न असून ते त्यासाठी डहाणूत तळ ठोकून बसले आहेत.तर राष्ट्रवादीचे आमदार आनंद ठाकूर शिवसेनेचे आमदार अमित घोडा तसेच बहुजन विकास आघाडी, माकपाच्या नेते मंडळीने आपल्या पूर्ण ताकदिनिशी ही निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.मुंबईपासून १२० कि.मी. अंतरावर तसेच महाराष्टÑ-गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या डहाणू नगरपरिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणूकीसाठी येथील काँग्रेस आय, राष्टÑवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, माकपा, बहुजन विकास आघाडी तसेच अपक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. १८ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यासाठी सुरूवात झाली असली तरी कोणत्याही पक्षाने नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहिर न केल्याने शहरात तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.सर्वच पक्षात नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदासाठी अनेक उमेदवारांचे गट तयार झाल्याने बंडखोरी होईल, या भीतीने अद्याप नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. नवीन नियमानुसार नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावाबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. डहाणू नगरपरिषदेच्या आगामी निवडणूकीसाठी येथील सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या दोन महिन्यापासून वातावरण निर्मितीबरोबरच उमेदवारांच्या मुलाखती घेऊन चाचपाणी, सुरू केली असली तरी मात्र अद्याप नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबतीत मौन बाळगले आहे.३३ हजार ८२६ मतदार असलेल्या डहाणू नगरपरिषदेत एकूण पंचवीस नगरसेवक निवडले जाणार आहे. त्यापैकी बहुसंख्य विद्यमान नगरसेवक पुन्हा ही निवडणूक लढविणार असल्याने ते कोणत्या पक्षात प्रवेश घेणार? नवीन उमेदवार कोण, नगराध्यक्ष कोण होणार? याबाबतीत तर्क वितर्क सुरू असून राजकीय घडामोडीना वेग आला आहे. तरी प्रचाराची रणधुमाळी मात्र अद्याप फारशी सुरू झालेली नाही.>सर्वच पक्षांत इच्छुकांची प्रचंड संख्याभाजपातून नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून भरत राजपूत, राष्टÑवादीतून नुकतेच शिवसेनेत प्रवेश करणारे रविंद्र फाटक, माजी नगराध्यक्ष मिहिर शाहा, डॉ. अमित नाहर, सुजाता माळी यांचे नाव पुढे येत आहे. तर राष्टÑवादीकडून तालुका अध्यक्ष राजेश पारेख, नगरसेवक प्रदिप चाफेकर यांच्या नावाची चर्चा आहे. शिवाय शिवसेनेतून संतोष शेट्टी, बरोबरच काँग्रेस आयकडून हाफिज रहेमान, माजी नगरसेवक संतोष मोरे, अशोक माळी, मोईज शेख यांची नावे नगराध्यक्षपदासाठी पुढे येत आहेत. तर बहुजन विकास आघाडी तसेच इच्छुक उमेदवारांचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
डहाणू नगर परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 2:16 AM