- हितेन नाईकपालघर - पालघर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे असून नगराध्यक्षपदाच्या युतीच्या उमेदवार डॉ. श्वेता मकरंद पाटील यांसह अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे, आ. रवींद्र फाटक यांनी पालघरमध्ये तळ ठोकला आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येणार असल्याने निवडणुकीची रंगत अधिकच वाढणार आहे२४ मार्च रोजी नगरपरिषदेची निवडणूक होणार असून सेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-बहुजन विकास आघाडी मध्ये लढत होणार असली तरी बंडखोरांनी निर्माण केलेले आव्हान अनेकांची डोकेदुखी ठरणार आहे. शहराचा विकास हा नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर आपला भर राहणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी पालघरवासीयांना दिला आहे.राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आ. रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे आदींनी मतदारांच्या घरी जाऊन युतीच्या उमेदवार नगराध्यक्ष डॉ. श्वेता मकरंद पाटील आणि सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. पाटील यांच्या प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री २२ मार्च रोजी पालघर मध्ये येणार आहेत.दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-बहुजन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. उज्वला काळे ह्यांनीही जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून स्वच्छ, सुंदर, निरोगी पालघर, भ्रष्टाचारमुक्त, प्रदूषणमुक्त पालघर करण्यासाठी मी कटीबद्ध असल्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.सोशल मीडियावर प्रचारअनेक उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी पुणे, नाशिक येथून आलेल्या टीम यूट्युब, टिष्ट्वटर, फेसबुक, मेसेज, व्हॉट्सअॅपद्वारे प्रचार करीत आहेत. तसेच इलेक्ट्रिक बॅनर खांद्यावर लटकवून प्रचार केला जात आहे.
पालघर नगराध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 3:14 AM