विक्रमगड : जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोट निवडणुका राज्य निवडणुक आयोगाच्या सार्वत्रीक निवडणुकीत विक्र मगड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या २९ प्राभागातील ४४ जागांसाठींच्या निवडणुकांचा कार्यक्र म जाहिर करण्यांत आला असून २३ जून रोजी या १७ ग्रामपंचायतींच्या निवणुकीसाठी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा पर्यत निवणूक घेण्यात येत असल्यसाचे तहसिल कार्यालयाकडुन सांगण्यात आले.
विक्रमगड तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायती पैकी १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या २३ जून रोजी होत असून २२ मे रोजी तहसिलदारांनी निवडणुक नोटीस प्रसिध्द करु न ३१ मे ते ०६ जुन सकाळी ११ ते दुपारी ३ वा.पर्यत नामनिर्देषनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. (०२ जुन ०५ जून सार्व. सुटी वगळून), ७ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नामनिर्देषनपत्रांची छाननी होणार आहे. १० जुन रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवरांना नामनिर्देषनपत्रे मागे घेण्याचा कालावधी, तर याच दिवषी निवडणुक चिन्हे नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिवस राहाणार आहे. तर मतमोजणी दुस-या दिवशी लगेचच होणार आहे.
तालुक्यासतील १७ ग्रामपंचायतीमधील (१) क-हे-तलावली-१ जागा, (२) खडकी-२, (३) डोल्हारी बु-१, (४) डोल्हारी खुर्द-१, (५) सुकसाळे-६, (६) वेहेलपाडा-२, (७) केगवा-बालापूर-५, (८) सवादे-२ (९) चिंचघर-६, (10) बांधण-१, (११) इंदगाव-३, (१२) मोहबु-३, (१३) उपराळे-१, (१४) जांभा-६, (१५) साखरे-१, (१६) खोस्ते-२, (१७) ओंदे-१ याप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाल्याने आता उमेदवारांकडे खूप थोडा वेळ हातात राहीलेला असून या थोडया वेळात अजून बरीच कामे करावयाची आहेत. त्यातच यावर्षी तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग संख्या वाढविण्यात आल्याने मत विभागणी होणार आहे. त्यामुळे आपल्या बाजुचीमते दुसºया प्रभागात गेली असल्याने आता उमेदवरांना जास्तच मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण नविन प्रभाग रचनेमुळे उमेदवारांची मतांची आकडेवारीही बदलेली आहे. तसेच व्यूहरचनाही त्यामुळे बदलावी लागणार आहे.
भाजपचे पारडे आहे जडतालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती हया भाजपाच्या सत्तेखाली असून त्यामुळे भाजपाचे पारडे जड आहे. परंतु यापूर्वी निवडून दिलेल्या उमेदवारांनी ग्रामपंचायती मार्फत गावामध्ये किती विकास कामे केली आहेत. यावरही सारेकाही अवलंबुन राहाणार आहे.