वसई : पालघर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या २६ डिसेंबरला होणार आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कालावधी संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.डहाणू तालुक्यातील वंकास, राई, सोगवे, आंबेसरी, बोर्डी, किन्हवली, मोडगाव, जांबुगाव, कापशी, सावटा, गांगणगाव, दापचरी, गोवणे, दाभोण या चौदा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत.पालघर तालुक्यातील बारा ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून त्यात उच्छेळी, सालवड, उनभाट, टेेंभी, खोडावे, चटाळे, लालोंडे, खानिवडे-गारगाव, शिरगाव, लालठाणे, जलसार, कपासे, मासवण या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तलासरी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून त्यात घिमाणिया, गिरगाव, करंजगाव, कवाडा, कुर्झे, उपलाट आणि उधवा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. विक्रमगड तालुक्यातील मलवाडा आणि मोखाडा तालुक्यातील साये, किनिस्ते या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. वसई तालुक्यातील अर्नाळा किल्ला, अर्नाळा आणि सायवन ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. याही वेळी बविआला विरोधक घेरणार आहेत.
जिल्हयातील ३९ ग्रामपंचायतींच्या २६ डिसेंबरला निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:41 AM