शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

आठ महिन्यांनी मिळाली वीज

By admin | Published: October 28, 2015 11:11 PM

आठ महिन्यांपासून खंडित झालेला वीजपुरवठा दिवाळीच्या आधीच पूर्ववत झाल्याने डहाणूतील नरपड गावच्या ठाकूरवाडीच्या साठीतल्या ठाकूर दाम्पत्याने ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.

बोर्डी : आठ महिन्यांपासून खंडित झालेला वीजपुरवठा दिवाळीच्या आधीच पूर्ववत झाल्याने डहाणूतील नरपड गावच्या ठाकूरवाडीच्या साठीतल्या ठाकूर दाम्पत्याने ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. डहाणू तालुक्यातील नरपड गावच्या ठाकूरवाडी येथे लक्ष्मण केशन ठाकूर (६३) आणि पार्वती (६१) हे राहतात. दहा वर्षांपूर्वी अपघातात लक्ष्मण यांना अंधत्व आले. त्यामुळे ते अंथरुणाला खिळूनच असतात. पतीची शुश्रूषा केल्यानंतर परिसरातील गावात फिरून कडधान्य विकून पार्वती संसाराचा डोलारा सांभाळते. तिन्ही मुली विवाहानंतर सासरी गेल्याने पती-पत्नी दोघेच असतात. आठ महिन्यांपूर्वी वीजमीटरमधील बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाला. याकरिता, डहाणू वीज वितरणच्या नरपड कार्यालयात पार्वती यांनी तक्रार केली. परंतु, तांत्रिक कारणास्तव आठ महिने त्यांना विजेपासून वंचित ठेवण्यात आले. लोकमतच्या पाठपुरव्यानंतर तेथील कोल्हे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंगळवारी वीजजोडणी करून दिली. (वार्ताहर)