- राहुल वाडेकर, विक्रमगड
तब्बल पंधरा हजार वीज ग्राहक असलेल्या विक्रमगड तालुक्याची वीजपुरवठ्याची समस्या तालुका निर्मितीनंतर दिड दशकाचा काळ ओलांडल्यानंतरही कायम असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. २६ जानेवारी २००९ रोजी उप कार्यकारी अभियंता या दर्जाचा अधिकारी व उप विभागीय कार्यालय येथे सुरु करण्यात आले असले तरी तीन सेक्शन कार्यालयाचा कार्यभार असलेल्या या विभागात केवळ १० कर्मचारी असलेले एकच सेक्शन कार्यालय असल्याने या समस्या कायम आहेत.़विक्रमगड अंंतर्गत १५२०१ वीज ग्राहकांसाठी ०५ उच्चदाब वाहिनी आहे. वितरणासाठी १५० रोहित्र असून ३५० कि ़मी़ उच्चदाब वाहिनी व ६१० कि़ मी़ लघुदाब वाहिनी आहे. मात्र एवढी मोठी यंत्रणा हाताळण्यासाठी तीन सेक्शनची गरज असतांना दहा कर्मचाऱ्यांचे एकच सेक्शन कार्यालय आहे त्यामुळे ते असून नसल्यासारखेच आहे. त्यामुळे विजेच्या समस्या कायमच आहेच़ त्यामुळे येथील उपविभागीय कार्यालय हे नुसते नावापुरते असल्याचा आरोप ग्राहक करीत आहेत. शहरातील ओंदे वीजकेंद्रातून साखरा, विक्रमगड व आलोंडा अशा तीन ट्रान्सफार्मरमधून त्या अंतर्गत येणाऱ्या गाव खेडयापाडयांना वीज पुरविले जाते़ त्यामध्ये एल. टी. लाईन १३०० कि़ मी च्यावर असून एस. टी. लाईन ३८० कि़ मी़ तसेच ३३/३२/११ के़ व्हीची लाईन ४० कि़ मी दुर्गम भागामध्ये पसरली आहे. या भागामध्ये अति पर्जन्यमान व डोंगर दऱ्या व अतिदाट जंगल असल्यामुळे वाहिनी नादुरुस्तीचे प्रमाण जास्त आहे़ जंगलभाग असल्याने पावसाळयात या लाईनमध्ये वा टन्सफार्मरमध्ये काही बिघाड झाल्यास वीज खंडीत होते व हा बिघाड दुरूस्त करणे वेळखाऊ असल्याने ग्राहकांना अंधारात रहावे लागते.विक्रमगड तालुका भौगोलिक दृष्टया चारही बाजूंनी ६ कि़ मी़ क्षेत्रफळात पसरलेला आहे. त्यांस एकूण १४० कि़ मी़ ची उच्चदाबाची विद्युत वाहीनी व लघु दाब असलेल्या ४४० कि़ मी ची वाहिनी आहे. तालुक्यांत एकच शाखा कार्यालय असल्यामुळे लाईन ब्रेक डाउन होणे, नविन सर्व्हिस कनेक्शन देणे, ना-दुरुस्त मीटर बदलणे, मेन्टनेन्स, वीज चोरीस आळा घालणे इत्यादी कामे करण्यासाठी अजून तीन सेक्शन कार्यालयाची आवश्यकता आहे़ जे कार्यालय आहे. तेथेही कर्मचारी, जागा अपुरी यामुळे ते कुचकामी ठरत आहे. यात एकूण ८ कर्मचारी असून सर्व तालुक्यांचा विजेच्या कामाचा बोजा हा त्यांच्यावरच पडत असल्याने तक्रारीमध्ये वाढ होते. पालकमंत्र्यांनी ऊर्जामंत्र्यांना प्रस्ताव दिलाय...विक्रमगड तालुका झाल्याने उप सहायक अभियंता कार्यालय सुरू झाले परंतु पूर्वीच्या जुन्या सहायक अभियंता कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर तालुक्याचा कार्यभार असल्याने उर्जामंत्र्यांकडे नव्याने तीन सेक्शन सहायक अभियंता कार्यालयाचा प्रस्तावउर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे जिल्हा आढावा बैठकीत पालकमंत्री विष्णू सवरा यांनी दिली आहे़ मात्र, त्यावर अजूनही अंमलबजावणी झाल्याची दिसत नाही. अशी माहिती सामाजिक कार्याकर्ते निलेश सांबरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली आहे