शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे धुळीचे साम्राज्य; जव्हारकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:26 PM

सर्दी, खोकला, श्वसनाच्या आजाराने नागरिक होत आहेत त्रस्त

जव्हार : शहराला जाणवणाऱ्या पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी  नगरोत्थान महाअभियान अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जव्हार नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे १८ कोटी रुपये निधी उपलब्ध करून तालुक्यातील खडखड या धरणातून जव्हार शहराला पाणी पुरवठा व नवीन नाळपाणी योजना कार्यान्वित करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र कंत्राटदार पाइप टाकताना रस्त्यालगत खोदून थातूरमातूर पद्धतीने कामे करत असल्याच्या तक्रारी होत आहेत.

दरम्यान, शहरभरात आता नागरिकांना कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे धूळ-मातीचा प्रचंड त्रास होत असून सर्दी-खोकला, श्वसनाच्या आजारांचा सामना करावा लागत आहे, मात्र प्रशासन मूग गिळून गप्प आहे.याबाबत नगर परिषदेने संबंधित कंत्राटदाराला सूचना देण्याखेरीज अद्याप कुठलीच कारवाई तथा दंड आकारण्यात आलेला नाही. 

 या योजनेत शहरासाठी नवीन पाइपलाइन, विविध ठिकाणी आरसीसीच्या लाखो लीटर क्षमतेच्या टाक्या, सोलर पंप स्टेशन, देखभाल दुरुस्ती अशा विविध बाबी समाविष्ट आहेत. सध्या कंत्राटदाराकडून नळ पाणी पुरवठा योजनेसाठी जव्हार शहरातून जमिनीखालून पाइपलाइन टाकली जात आहे. त्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ते खोदले जात आहेत.

या कामामुळे प्रचंड प्रमाणात माती रस्त्यावर पसरली आहे. मातीमधून उडणाऱ्या धुळीचे प्रमाण खूप असून, धुळीमुळे जव्हारच्या नागरिकांना सर्दी, खोकला तसेच श्वसनाचे विकार जडले आहेत. दरम्यान, एकीकडे कोरोना विषाणूची सर्दी-खोकला ही प्राथमिक लक्षणे असून धुळीमुळे सर्दी-खोकला होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.  पाइप टाकायचे म्हणजे रस्ता खोदावा लागणार हे निश्चित, पण खोदलेले रस्ते थातूरमातूर बुजवले जात आहेत. त्याचा  नागरिकांना होणारा त्रास, अपघात होतात त्याचे काय, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार