पालघर - भाजपकडे कार्यकर्त्यांच्या फळीची कमतरता असल्याने तिने आपल्या प्रचारासाठी पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्यकर्ते बनविले असल्याचा आरोप शिवसेनेच्या आमदार निलम गो-हे आणि अनिल परब ह्यांनी पत्रकार परिषदेत करून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.मुख्यमंत्र्यांच्या साम, दाम, दंड, भेद आणि अरे ला कारे असे उत्तर द्या. अशी वक्तव्य केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत असताना मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनबाबत केलेल्या गंभीर वक्तव्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने पालघर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.शुक्र वारी पालघर येथे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्याच्या भाषणाची क्लिप वाजून दाखिवण्यात आली.त्या क्लिप मधील आवाज हा माझाच असल्याचे त्यांनी मान्य केले.मात्र शिवसेनेकडून त्यात काही बदल करण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केल्या नंतर सेनेने हे बदल केलेत हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे असे आव्हान सेनेच्या आ.गो-हे ह्यांनी दिले.साम, दाम, दंड भेद म्हणजे कुटनीती असे म्हणणाºया मुख्यमंत्र्यांनी डहाणू मध्ये झालेल्या पैसे वाटप करून दाम ह्या शब्दाचा अर्थ दाखवून दिल्याचे आ.परब ह्यांनी सांगितले. वनगा कुटुंबीयांनी दिवंगत चिंतामण वनगा चा फोटो वापरीत असल्या बाबत निवडणूक आयोगा कडे तक्र ार करूनही निवडणूक संपत आला तरी भूमिका स्पष्ट होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.आमच्या बोईसर मधील शिवसैनिकावर खंडणीचे गुन्हे दाखल प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यांच्यावर तात्काळ तडीपारीच्या नोटीसही बजावण्याची तत्परता मुख्यमंत्र्यांनी इतर बाबतीत ही दाखवायला हवी होती असे आ.गोº्हे ह्यांनी सांगितले.ह्या सर्व प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी ह्यावेळी करण्यात आली.
कर्मचारी बनले भाजपाचे कार्यकर्ते, नीलम गो-हे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 6:35 AM