जव्हार : नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र, प्रभाग निहाय छोट्या निवडणूका असल्याने सर्व सामान्य मतदार मात्र सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे उघडपणे कोणत्याच पक्षांच्या उमेदवाराबरोबर ते फिरत नसल्याने सध्या सर्वच पक्षाना कार्यकर्त्यांची चणचण भासू लागली आहे.यातुनच राजकीय नेत्यांना रोजंदारीवर माणसे मिळवण्याची वेळ आली आहे. यामुळे येथील बेरोजगाराना रोजगारही मिळू लागला आहे. तर वरिष्ठ नेत्याना गर्दी दाखिवण्यासाठी बाहेरूनही गर्दी आयात केली जात असल्याने गर्दी जमविताना उमेदवारांची दमछाक होत आहे.एकुण १७ उमेदवार आणि एक नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार असे गणित असल्याने जव्हार मध्ये आजघडीला जव्हार प्रतिष्ठान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी चौरंगी लढत होत आहे. याशिवाय नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार मातब्बर असल्याने सध्या नेमके वारे कुणाच्या दिशेने वाहते हे ही सांगणे कठीण बनले आहे. त्यातूनच आरोप प्रत्यारोप, सोशल मिडियावरुन डावपेच सुरु आहेत. मात्र, कार्यकर्ते आणायचे कुठून हा मोठा प्रश्न असून यासाठी आता चक्क रोजंदारी वर माणस घेतली जात आहेत. त्यासाठी सुरवातीला ३०० रु पये रोज दिला गेला मात्र आता ५०० रु पये असा दरही सुरु असल्याची चर्चा आहे.या भागात शासनाची रोजगार हमीची योजना सर्वांनाच चांगला रोजगार देण्यात अपयशी ठरत असतांना हा राजकीय रोजगार सर्वांनाच परवडणारा ठरत आहे. दरम्यान, जमणाºया गर्दीमध्ये अनेक हवशे, नवशे व गवशे असल्याने निष्ठावंताचा टक्का घसरला आहे.गाव लहान आणि पक्ष जास्त दिसत असल्यामुळे स्थानिक तरुण संधीची वाट पाहत आहेत. कारण निवडणूक एका दिवसाची मग उगाच शत्रुत्व का घ्यायचे असा एक विचार पुढे येत आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारा निमित्त जिल्हा पातळीवचे नेते जव्हार मध्ये दाखल होत असल्याने स्थानिक पुढाºयांची प्रतिष्ठा जपण्यासाठी विकतचे कार्यकर्ते हाच एक पर्याय त्यांना सोपा वाटत आहे.वाड्यामध्ये बविआचा विकासाचा मुद्दा; राष्टÑवादीसोबत मैत्रीपूर्ण लढतीवाडा : येथील नगरपंचायत निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने राष्ट्रवादी कॉंग्रेस व रिपब्लिकन पक्ष (ए) सोबत आघाडी केली असून शहराच्या सर्वागीण विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार असल्याचा दावा बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळीराम जाधव यांनी केला आहे. वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ डिसेंबर रोजी होत आहे.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने नगराध्यक्षपदाकरीता अमृता मोरे यांना उमेदवारी दिली असून नगरसेवक पदाकरिता ११ प्रभागात आपले उमेदवार उभे केलेत तर प्रभाग क्रं. १४ हा अनुसूचित जातीकरिता राखीव असलेला प्रभाग मधून आरपीआय चा उमेदवार दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाकरीता बहुजन विकास आघाडीसोबत आघाडी केली आहे.असे असले तरी अनेक प्रभागांमध्ये त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. बहुजन विकास आघाडीने शनिवारी माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढणार असल्याचे सांगितले.
निवडणुकीमुळे रोजगाराचा प्रश्न मिटला, बेरोजगारांना रोज ५०० रुपयांचा दर? जव्हारमध्ये राजकीय पक्षांनी जमवली बाहेरील गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:16 AM