मनोर : पालघर जिल्ह्यात वन जमिनीवर अतिक्रमण करून राजरोसपणे बांधकाम केले जाते, तर काही दगड खाणी मालक त्या जमिनीचा वापर करून कपची दगडांचे डेपो साकारत आहेत. परंतु वन कर्मचारी व अधिकारी कारवाई न करिता त्यांना पाठीशी घालत आहेपालघर जिल्ह्यातील मनोर परिसरात मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका चिल्हार फाटा अवढणी वेलगाव अशा अनेक गावात वन जमिनीत एकसाली प्लँट तसेच नवीन शर्तीच्या जमिनीत घरे हॉटेल्स दुकाने बांधले जातात. मात्र वन क्षेत्रपाल कार्यालय अंतर्गत नेमलेले अधिकारी कर्मचारी बघ्याची भूमिका करताना दिसत आहेत. त्यांच्या समोर अतिक्रमणे होत आहेत. मात्र ते कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना अतिक्रमण करण्यास मदत करीत आहेत.तसेच नागझरी लालोंडे परिसरात तामसई चिल्हार येथे वनजमिनीत दगडखाणी मालकांनी वनजमिनीत दगड कपची मुरूम चे मोठमोठे ढिगारे साठवले आहेत व त्या रुपाने अतिक्र मण केले आहे. तरी सुद्धा वनविभाग डोळेझाक करीत आहे मग अतिक्रमणे थांबणार कशी? असा प्रशन पडला आहे. वी. जे. भिसे उपवनरक्षक अधिकारी डहाणू यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी पथक पाठवून कारवाई करतो.
जमिनीवर अतिक्रमण, कारवाई शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 10:47 PM