जव्हार : विरोधी पक्षनेते दिपक कांगणे व कुणाल उदावंत यांनी सोमवारी सत्ताधारीपक्षाच्या नगरसेविका संगिता अहिरे आणि स्वाती सोनवणे यांच्या विरुद्ध अतिक्रमण केल्याची तक्रार करताच या दोघींनी या दोघांविरुद्ध पालिकासभेत आपल्याला लज्जा निर्माण होईल असे वर्तन केल्याचा एफआयआर दाखल केला. या दोघांना न्यायालयात हजर केले असता आज जामीन मंजूर करण्यात आला.
या दोघींचे नगरसेवकपद सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करावे अशी मागणी विरोधीपक्षनेत्यांनी केली आहे. यामुळे या दोघींचे पद धोक्यात आले आहे. नगरसेविका संगिता नंदकिशोर अहिरे यांनी त्यांच्या घराजवळच्या बोळीमध्ये तसेच आकार प्लाझा येथे बियर शॉपीद्वारे अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या नगरसेविका स्वाती सोनवणे यांनी राहत असलेल्या इमारतीद्वारे आणि त्यांच्या पतीने गोरवाडीत असलेल्या सर्व्हीस स्टेशनच्या रुपाने केलेल्या अतिक्रमणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. यामुळे आता यांचे पद रद्दबातल होणार ? की नगरसेवक आहेत म्हणून अभय मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे.