- आशिष राणे
वसई : वसई विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी सुरु वातीपासूनच मतांची आघाडी घेत ६ व्या फेरी नंतर आपल्या ऐतिहासिक वसईच्या विजयाची पताका रोवली. २५ हजार मतांचा विक्र मी टप्पा पार करीत त्यांनी आपला विजय नोंदवला. वसईत ६ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत हितेंद्र ठाकूर आणि शिवसेना उमेदवार विजय पाटील यांच्यात होती.
वसई निवडणुकीच्या मतमोजणीत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा उमेदवार हितेंद्र ठाकूर यांना २५ हजार ८३६ मतांनी विक्र मी आघाडी घेत ते विजयी झाले. या ऐतिहासिक लढतीत ठाकूर यांना एकूण १ लाख २ हजार ४६८ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार विजय पाटील यांना एकूण ७६ हजार ६३२ मतांवर समाधान मानावे लागले.
सुरुवातीस युती होईल की नाही अशी अटकळ होती. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घटक पक्षांना घेऊन महाआघाडी तयार केली. खरे तर एका बाजूला आगरी, कुणबी, आणि आदिवासी समाज तर दुसरीकडे पश्चिम पट्ट्यातील ख्रिस्ती मतांचे मोठे विभाजन होणार अशी अटकळ होती. मात्र ठाकुरांना या तीनही समाजबांधवाकडून तसेच वसईच्या पूर्व - पश्चिम भागातून बऱ्यापैकी मते मिळाल्याने विरोधाचा प्रचार करूनही ठाकुरांचे मताधिक्य वाढले व ठाकूर पुन्हा निवडून आले.
आजवरच्या विकास कामांना जनतेसमोर ठेवून यापुढेही आपण एमएमआरडीए, सॅटेलाईट सिटी, आणि वसई - विरार महापालिकेच्या माध्यमातून केवळ विकास हेच उद्दिष्ट समोर ठेवून आपण विकासाला प्रध्याना देत आहोत, हा प्रचाराचा एकमेव आणि प्रमुख मुलभूत गरजांचा खरा मुद्दा वसईकरांसमोर मांडल्यानेच हितेंद्र ठाकूर यांना वसईचा गड पुन्हा काबीज करता आला.
त्यातच विरोधकांनी विकासाच्या मुद्द्यावर न बोलता केवळ ठाकुरांची दहशत आणि त्यांच्या गुंडागर्दीवर बोलून अखेरच्या दिवसापर्यंत हा गुंडिगरीचा चुकीचा अपप्रचार सुरू ठेवला. हा मुद्दा विरोधकांना भोवला. त्यामुळे ही निवडणूक तशी एकतर्फीच झाली, असे म्हणावे लागेल. मात्र बविआ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आणि स्वत: हितेंद्र ठाकूर यांनी प्रचाराचा झंझावात वसई भर करून वसईत केवळ पिवळे वादळ निर्माण करीत वसईतील विकासाचाच मुद्दा पुढे नेला आणि विरोधकांची पुरती हवाच काढून टाकली. येथे काहीही दहशत किंवा गुंडगिरी नाही हेच या दणदणीत विजयाने पुन्हा दुसऱ्यांदा दाखवून दिले.
वसई गावातील सेंट गोंसालो गारिसया महाविद्यालय व त्याच्या प्रांगणात गुरुवारी रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरु वात झाली. त्यात पहिल्या आणि नंतरच्या ६ व्या फेरीपासूनच बविआचे हितेंद्र ठाकूर यांनी मताधिक्याची घोडदौड कायम राखली होती. दुसºया फेरीपर्यंत ठाकूर यांनी दीड हजार मतांची आघाडी घेतलेली होती.
अगदी ११ व्या फेरीपर्यंत ही आघाडी कमी अधिक फरकाने कायम ठेवण्यात ठाकुरांना यश आले. ज्या ठिकाणी मागील वेळी गावांचा मोठा विरोध राहिला त्याच ग्रामीण पट्यातून ठाकूर यांनी आपली मतांची आघाडी कायम राखीत अखेर शहराकडील मतपेट्याच्या आकडेवारी आल्या तेव्हा अवघ्या काही तासातच ठाकूर यांनी घवघवीत विजय संपादन केला. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या विजयाचे सारे श्रेय केवळ वसईकरांना दिले आहे.
आपली राजकीय पोळी भाजण्यात अयशस्वी ठरलेले शिवसेनेचे उमेदवार विजय पाटील यांना या पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. तसेच ग्रामीण भागातून ठाकूर यांच्या पारड्यात टाकलेली निर्णायक मते पाहिल्यास ग्रामीण आणि शहरी जनतेनेही विजय पाटील यांना नाकारले आहे. अगदी शांततेत ही निवडणूक प्रक्रि या वसईचे निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील तांगडे व सहा. निवडणूक अधिकारी किरण सुरवसे व अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडली.