रविंद्र साळवे । लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : केंद्र शासनाकडून निराधार वृद्धांना संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनांच्या माध्यमातून जे अल्प अर्थसहाय्य दिले जाते. ते मिळविण्यासाठीही त्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. शुक्रवारी हे अर्थसहाय्य त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोखाडा शाखेपुढे सकाळी ९ वाजल्यापासून या वृद्धांनी लावलेली रांग मोखाडा बस स्थानका पर्यत गेली होती. तरु ण वयातील माणसांना धड एकाच जागेवर दीड दोन तास उभे राहण्यासाठी मोठे मुश्कील असते त्यात या वृध्दांना नंबर येई पर्यत ऊन्हातान्हात रस्त्यावर दीड दोन तास ताटकळावे लागले. या समस्येवर इलाज म्हणून अर्थसहाय्यची ही रक्कम केवळ टी.डी.सी बँके मार्फत न देता इतर राष्ट्रीय कृत बँका अथवा जव्हार अर्बन बँक अशा बँकांत विभागून द्यावी ते शक्य नसेल तर ही रक्कम त्यांच्या खात्यात त्यांना पूर्वकल्पना देऊन वेगवेगळ्या दिवशी जमा करावी म्हणजे त्यांच्यावर ताटकळण्याची वेळ येणार नाही. अशी अपेक्षा त्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली आहे.
दमड्यांसाठीचा वृद्धांचा संघर्ष संपता संपेना
By admin | Published: June 18, 2017 1:59 AM