वसई : पर्यावरण संवर्धन समितीतर्फे महानगरपालिका परिवहन बसखाली सापडून मृत्यू पावलेल्या व्यक्तींना पालिका मुख्यालयासमोर श्रद्धांजलि वाहण्यात येणार आहे. या मृत व्यक्तींना सर्वस्वी परिवहनचा खाजगी ठेकेदार जवाबदार असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीतर्फे करण्यात येत आहे.२६ फेब्रूवारी रोजी भुईगांव येथील कमल गोविंद जोशी (६०) या महिलेचा बसखाली चिरडून मृत्यू झाला होता. वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट या खाजगी ठेकेदारामार्फत चालविली जाते. या कंपनीच्या ठेकेदाराने नेमलेले चालक बेदरकारपणे अतिवेगात शहरात बस चालवित असल्याच्या तक्र ारी येत आहेत. अनेकदा हे चालक वाहतूक व रहदारीचे नियम पाळत नसल्याचे समोर आले आहे. मध्यंतरी महिला प्रवाशांशी उद्धत वर्तन करत असल्याचा चालकाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल झाला होता. या कंपनीच्या अनेक बसेस मंजूर स्वरूपाच्या असून कार्बन मोनाक्साईडसारखा घातक धरू वातावरणात सोडत असल्यामूळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप पर्यावरण संवर्धन समितीचे समन्वयक समिर वर्तक यांनी केला आहे.इतर महानगरपालिका क्षेत्रातील अपघातांच्या प्रमाणापेक्षा आपल्या येथे ते प्रमाण कमी आहे. १८ लाख विम्यातून अपघातग्रस्तांना मदत केली असून, काही ठिकाणी विम्याची रक्कम येणे बाकी आहे. बसेस चांगल्या स्थीतीत आहेत.- मनोहर सकपाळ, ठेकेदार, मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट कंपनीभुईगांव येथील मृत महिलेच्या वारसांना मदत म्हणून स्थानिक नगरसेवक यांनी ५० हजार व परिवहन कडून १५ हजार अशी एकूण ६५ हजार मदत करण्यात आली आहे. चालकांनी कामावर असताना मोबाईल जवळ ठेऊ नये म्हणून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत.- प्रितेश पाटील, परिवहन सभापती
पर्यावरण समिती परिवहनला दाखवणार ‘आरसा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:23 PM