वसई : वसई पश्चिमेच्या गिरीज येथे एक बावखळ बुजविण्यात येत असल्याची माहिती गावांतील पर्यावरण प्रेमींना मिळताच त्यांनी शनिवारी संध्याकाळी तेथे जाऊन घोषणाबाजी करून निषेध नोंदवला. यावेळी विविध संघटनांचा या आंदोलनात सहभाग होता. तसेच विधानसभेचे मनसेचे उमेदवार प्रफुल्ल ठाकूर या आंदोलनात सहभागी झाले होते.
पर्यावरणाचे रक्षण, पाण्याची जमिनीतील पातळी राखण्यासाठी पूर्वापार असलेली बावखळ वाचवणे गरजेचे झाले आहे. मात्र अलीकडे पश्चिम पट्ट्यातील बावखले बुजविण्याचे प्रकार सर्रास वाढीस लागले आहेत.
दरम्यान, ‘बावखळ वाचवा’ या आंदोलनामुळे वसईचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी या घटनेची त्वरित दखल घेत घटनास्थळी मंडळ अधिकारी सोनावणे आणि तलाठी दिनेश पाटील यांना पाठवले. यामुळे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी तेथे रीतसर पंचनामा केला आहे. विशेष म्हणजे पंचनाम्यात बाबखले बुजविण्याऱ्यांची नावेही देण्यात आली आहेत. या पंचनाम्यावर तहसीलदार यांनी त्वरित कारवाई करण्याचे कबूल केले आहे. तसेच मातीभराव करणाºया ट्रकवरही कारवाई होणार आहे. याचेही पंचनामे करण्याचे कबूल केले असून त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
या आंदोलनात लेमभाट वाडी, सर्व गावकरी डॉमनिका डाबरे, रवी डाबरे, समीर वर्तक, प्रसिध्द पथनाट्यकार झुराण लोपीसव डायगो, विक्र ांत चौधरी, दर्शन राऊत तसेच ध्यास फाऊंडेशनच्या सुरेखा कुलकर्णी आदी उपस्थित होते.