पालघर - मच्छीमारांची नाराजी त्यांच्यासाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना केल्याने दूर होणार असून, शेतकऱ्यांप्रमाणे ४ टक्के व्याजाने मच्छीमारांना कर्ज मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातपाटी येथे मच्छीमार-संवाद कार्यक्र मात शुक्रवारी सांगितले.मच्छीमार समाज सध्या मत्स्यदुष्काळासह अनेक समस्यांचा सामना करीत असून, अनेक प्रकल्प त्यांच्यावर लादले जात असल्याने निर्माण झालेल्या अडचणी मुख्यमंत्र्यांनी दूर कराव्यात, यासाठी सातपाटी मच्छीमारसहकारी संस्थेच्या प्रांगणात कार्यक्र माचे आयोजन केले होते. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.या वेळी मुख्यमंत्र्यांनी परराज्यातील पर्ससीन ट्रॉलर्सना रोखण्यासाठी कोस्टगार्डची मदत घेतली जाणार असून, एलईडी मासेमारी करणाºयांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. महिलांना १० हजार शीतपेट्या महिलांना वाटप करण्यात येणार असून, मच्छी मार्केटसाठी पालघरमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास निधी देऊ, असेही सांगितले.भूकंपाबाबत आढावा बैठकपालघर येथील नूतनीकरण केलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी भूकंपाबाबत आढावाबैठक घेतली.त्या वेळी जिल्हाधिकाºयांनी भूकंपाच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करताना, डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीजवळ भूकंपाचे केंद्र असून, जवळपासची १७ गावे प्रभावित झाल्याची माहिती दिली.
मच्छीमारांसाठी स्वतंत्र मत्स्य मंत्रालयाची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 5:59 AM