शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

इ. स. पू. २०६ मध्ये युद्धात पतंगांचा झाला होता वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 11:35 PM

संक्रांतीतील पतंगबाजीला जागतिक इतिहासाची जोड

- सूनिल घरत

पारोळ : मकर संक्र ांत म्हटले की आपल्याला वेध लागतात ते तिळगुळाचे आणि पतंगांचे. विविध प्रकारचे पतंग आज वसई विरार परिसरात विक्र ीला आले आहेत. पतंग बाजीसाठी नागरीक सज्ज झाले आहेत पण पतंगाच्या खेळाला एक रंजक इतिहास आहे, या इतिहासाचा हा धांडोळा.

प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ व शास्त्रज्ञ टरेन्टमचा आर्काईटस याने इ. स. पू. पाचव्या-चौथ्या शतकांत पतंगाचा शोध लावला असे मानले जात असले, तरी आशिया खंडात तो त्यापूर्वी अनेक वर्षे ज्ञात असावा, असे दिसते. एक चिनी सेनानी हान सिन याने इ. स. पू. २०६ मध्ये युद्धात पतंगाचा वापर केला होता. कोरियन, चिनी, जपानी व मलायी लोकांचा पतंग हा राष्ट्रीय खेळ आहे. पतंगाशी काही धार्मिक समजुतीही निगिडत आहेत.पतंगाचे उपयोग : विमानांचा शोध लागेपर्यंत पतंगाचा सैनिकी व इतर उपयुक्त कामांसाठीही उपयोग करीत असत. एका कोरियन सेनापतीने आपल्या सैनिकांना स्फूर्तिदायक इशारे देण्यासाठी दिवा जोडलेला पतंग उडविला, अशी समजूत आहे. हेस्टिंग्जच्या लढाईत इशारे देण्याकरिता पतंग वापरण्यात आले. बोअर युद्धात टेहळणीसाठी आणि माणसांना वाहून नेण्याकरिता पतंगांचा उपयोग करण्यात आला होता. त्याचप्रमाणे उंचीवरून छायाचित्रे घेण्यासाठी पतंगांचा उपयोग करीत असत. पतंगाचा उपयोग करून केलेले छायाचित्रण (काइट फोटोग्राफी) हाही एक लोकिप्रय छंद ठरला आहे.बेंजामिन फ्रँकलिन या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाने १७५२ साली पतंगाला बांधलेल्या किल्लीवर वादळी वीज आकर्षित करून त्याचा अभ्यास व प्रयोग केला होता. वातयानाचा (बलून) शोध लागण्यापूर्वी पतंगाच्या साहित्याने जास्तीत जास्त उंचीवरील वातावरणाचा अभ्यास करीत असत. १८९४ मध्ये कॅ. बेडन पोएल याने १०.९७ मी. उंचीचा पतंग तयार करून त्याच्या साहाय्याने एक मनुष्य हवेत ३०.४८ मी. उंच उचलून दाखिवला. माकोर्नी यानेही आपल्या बिनतारी संदेशवाहकाचे प्रयोग करण्यासाठी मोठ्या पतंगांचा उपयोग केला होता.१९१० मध्ये माउंट वेदर वा येथे पियानोच्या तारेची दोरी करून, एकाला एक पतंग जोडीत ७,२६५ मी. (२३,८३५ फूट) या कमाल उंचीपर्यंत पतंग नेण्यात आला होता. नायगारा धबधब्याच्या टांगत्या पुलाची पिहली तार टाकण्यासाठीही प्रथम पतंगाचाच उपयोग केलेला होता. दुस-या महायुद्धात पाणबुड्यांच्या टेहेळणीच्या टप्प्यात वाढ व्हावी, म्हणून हेलिकॉप्टरसारख्या दिसणाऱ्या तीन पात्यांच्या पतंगाचा उपयोग नाझी करीत असल्याचे उल्लेख सापडतात. गोलंदाजांना विमानांवर नेम घेण्याचा सराव व्हावा, म्हणूनही अमेरिकेत पतंगाचा उपयोग करीत.पतंगांचे विविध प्रकारकरकोचाच्या आकाराचा चिनी पतंग, स्त्रीप्रतिमेचा अलंकृत चिनी पतंग, इका-बाटा : जपानी पतंगाचा नमूना, पेटी-पतंग, साध्या पतंगाची आकृती, कोरियन पतंग, त्सुरू कामे : करकोचा व कासव यांच्या आकृत्यांनी युक्त जपानी पतंग, सयामी पतंग.

 

टॅग्स :kiteपतंग