शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वत्र सज्जता, पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, जीवरक्षकही तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 2:53 AM

अनंत चतुर्दर्शीच्या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६०७ सार्वजनिक, तर ४ हजार ८०७ खाजगी गणरायांचे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासह अन्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

- हितेंन नाईकपालघर - अनंत चतुर्दर्शीच्या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६०७ सार्वजनिक, तर ४ हजार ८०७ खाजगी गणरायांचे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासह अन्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सीआरपीसी कायद्यान्वये १ हजार ८८१ जणावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील ६६ संवेदनशील ठिकाणावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.१३ सप्टेंबर पासून गणेशोत्सव उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर जिल्ह्यात एकूण २ हजार ५५७ सार्वजनिक तर ३७ हजार ८५२ गणपती मूर्त्या, ३९७ सार्वजनिक गौरी मूर्त्यां तर ३ हजार २९१ खाजगी मूर्त्यांची स्थापना झाल्याने व २० सप्टेंबर रोजी मोहरम आल्याने पोलीस अधीक्षक गौरव सिंग ह्यांनी कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने विशेष दक्षता घेतली होती. सर्व सण लागता शांततेत साजरे व्हावेत यासाठी स्वत: जुगार, दारू, बेकायदेशीर शस्त्र साठे आदी अनैतिक धंद्याचा बिमोड करण्यासाठी कारवाई सुरू केली होती. गणेशत्सवा दरम्यान १ हजार ८८१ समाजकंटकांवर महाराष्ट्र मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलीस अधिक्षक कार्यालयातील उपनिरीक्षक. हेमंत काटकर यांनी दिली.जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये अनंत चतुर्दर्शीच्या मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या मूर्त्यांच्या विसर्जनासाठी वाहतूक नियंत्रण, स्वयंसेवक, साध्या वेषातील पोलीस अधिकारी, अग्निशमन सेवा, आरोग्य पथके आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा १०६ गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली होती. वसई तालुक्यात २९३ सार्वजनिक तर ४ हजार २०४ खाजगी गणेशमूर्त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे. पालघर तालुक्यात १०५ सार्वजनिक तर २६८ खाजगी, डहाणू तालुक्यात ४० सार्वजनिक तर २५ खाजगी, तलासरी तालुक्यात ७ सार्वजनिक तर खाजगी ० ,जव्हार तालुक्यात ४२ सार्वजनिक तर १५० खाजगी, मोखाडा तालुक्यात ६३ सार्वजनिक ११९ खाजगी, विक्रमगड तालुक्यात १७ सार्वजनिक तर ६ खाजगी, तर वाडा तालुक्यात ३८ सार्वजनिक तर ३५ खाजगी गणेश मूर्त्यांचे विसर्जन उद्या होणार आहे.जिल्ह्याला १०७ किमीचा सागरी किनारा लाभला असून सातपाटी, केळवे, अर्नाळा हे सागरी पोलीस ठाणी तर पालघर वसई, विरार, सफाळे, तारापूर, डहाणू, घोलवड असे ७ सागरी व खाडी किनारा पोलीस स्टेशन अंतर्गत १३ बंदरे असून ६२ लँडिंग पॉर्इंट आहेत. ६६ संवेदनशील ठिकाणावर पोलिसांचे बारीक लक्ष राहणार असून पोलीस अधीक्षक सिंग ह्यांच्या देखरेखी खाली अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण,वसईचे विजयकांत सागर ह्यांच्यासह ६ उपविभागीय पोलीस अधिकारी, १२२ वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक, १ हजार २७० पोलीस, ९५ महिला पोलीस, ३०० पुरुष होमगार्ड, ५० महिला होमगार्ड, १ एसआररपीएफ कंपनी तैनात करण्यात आले आहेत. ७४ सागरी रक्षक दल तर १ हजार ४९५ सदस्य किनारपट्टीवरील संशयास्पद हालचालीकडे पोलिसांसोबत बारीक लक्ष ठेवणार आहेत.वसई तालुक्यातील सर्वाधिक गणेशमूर्त्यांचे विसर्जन होणार असल्याने गर्दीचे स्वरूप पाहता विसर्जन ठिकाणावरील वाहतूक एकेरी अथवा अन्य पर्यायी मार्गाकडे वळविण्यात आली आहे. चेन स्नॅचिंग, पीक पॉकेटिंग वर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात आले असल्याचे वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर ह्यांनी लोकमतला सांगितले.पालघर शहरात ३७ सार्वजनिक तर ७२ खाजगी मूर्त्यांचे विसर्जन होणार असून शहरातील गणेश कुंडा मध्ये ह्या मूर्त्यांचे विसर्जन केले जाते. पालघर जिल्ह्याचे ठिकाण असल्याने विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांमुळे रेल्वे स्टेशन मार्ग, मनोर, माहीम, बोईसर, कचेरी रोड, गणेश कुंड रोड गर्दीने फुलून जातात. हुतात्मा स्तंभ ते जगदंबा रोड दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा राजकीय पक्षाचे, संघटनांचे मंडप लावण्यात येत असतात. त्यांच्याकडून खाण्याचे पदार्थ, पिण्याचे पाणी, स्मृती चिन्हे याचे वाटप केले जाते. पालघर नागरपरिषदे कडून विसर्जन ठिकाणी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून प्रकाश व्यवस्था, होमगार्ड, लाईफगार्ड आदींची चोख व्यवस्था नगराध्यक्ष उत्तम पिंपळे,मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे ह्यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेने रस्त्यातील खड्डे भरण्याची कामे पूर्ण केली आहेत.सात दिवसाच्या विसर्जना दरम्यान पालघर पोलीस आणि गणेश मंडळ कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या विवादाच्या पाशर््वभूमीवर सार्वजनिक मंडळे आणि पोलिसात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी मंडळांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या.मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेशोत्सव मंडळांनी निर्धारित कालावधीत मिरवणूक पार पाडण्यासाठी आपला गणपती नेणारे वाहन मध्येच थांबवू नये ते चालते ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.त्याचप्रमाणे जीवरक्षक म्हणून कार्य करण्यासाठी उत्तमरित्या पोहता येणाऱ्यांनी प्रशासनाला स्वयंसेवक या नात्याने सहकार्य करावे असेही आवाहन पोलीस जिल्हा प्रशासनाने जनतेला केले आहे.वसईत गणेश विसर्जनासाठी पोलीस व पालिका प्रशासन सज्जपारोळ : अनंतचतुर्दशीला होणाºया बाप्पांच्या विसर्जनासाठी पोलिस व,महापालिका प्रशासन सज्ज झाले आहेत.मिरवणूक लवकरात लवकर पार पडावी आणि वाहतूकी कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी मंगळवारी गणेश मंडळांना रस्त्यात थांबण्यास मनाई केली आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी ‘डीजे’लाही न्यायालयाने बंदी घातली आहे, शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी सोमवारी गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची बैठक घेतली आणि त्यांना विविध सूचना केल्या. वसईत साधारणपणे ५८६ सार्वजनिक ३,६५३ घरगुती यांचे विसर्जन होणार असून या साठी ६० विसर्जन स्थळे, सज्ज आहेत, महापालिकेने विद्युत विभाग, स्वच्छता विभाग, अग्निशमन दल या विभागाचे कर्मचारी सर्व विसर्जन स्थलांवर तैनात केले आहेत.अतिरिक्त पोलीस अधीक्षक, विभागीय पोलीस उपअधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वि पोलीस उपनिरीक्षक आणि साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, यापोलिस अधिकारी यांचा बंदोबस्तात समावेश असून या शिवाय गृहरक्षक दलाचे पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, तीन दंगल नियंत्रण पथक तैनात आहेत. जागोजागी टेहळणी मनोरे उभारण्यात आले आहेत.आम्ही शहरांत चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी खास खबरदारी घेण्यात येत आहे. शहरात नाकाबंदी, मद्यपि चालकांविरोधात मोहीम, बीट मार्शलची गस्ती तसेच साध्या वेषातील पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.-विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसईबोईसरला ११६ मूर्तींचे विसर्जन होणारबोईसर : या शहरात शंभर खाजगी व १६ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन वेगवेगळ्या ठिकाणी होणार असून ते सुरळीत व शांततेत पार पाडण्याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे तर मिरवणुकीमध्ये डीजे वर बंदी कायम ठेवण्यात आली असून त्याचा वापर करणाºयांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. सार्वजनिक १६ गणेशमूर्ती पैकी १२ बेटेगाव, ३ आलेवाडी समुद्रकिनारी तर एक वंजारवाडा कुंड येथे विसर्जन होणार आहे सुरक्षिततेसाठी राज्य राखीव दलाची एक प्लॅटून, पंधरा होमगार्ड, वनविभागाचे तीन कर्मचारी तर पालघर पोलीस मुख्यालयातून मागविण्यात आलेल्या अतिरिक्त पोलीस बळासह बोईसरचे सहा अधिकारी ६५ पोलीस सज्ज राहणार आहेत.बेटेगाव येथील विसर्जनाच्या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहे. पंचतत्व सेवा मंडळाचा व एमआयडीसी चा महाराजा गणपती एमआयडीसी नाक्यावरून चित्रालयच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर अवजड वाहनां करीता एमआयडीसी नाका ते बोईसर रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता बंद करण्यात येऊन ती वाहने एमआयडीसीतून वळविण्यात येणार आहेत. पालघरहून येणाºया व जाणाºया एसटीच्या बसेस मुकट टॅन्क ते ओसवाल मार्गे एसटी डेपोत ये जा करतील मिरवणुकीच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गर्दीच्या ठिकाणी पार्किंगला बंदी घालण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मंडळांनी आपली मिरवणूक मार्गात थांबवू नये असे आवाहन केले गेले आहे.वाहनांची सजावट सकाळपासूनच होणार सुरूबोर्डी : डहाणू आणि घोलवड या पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण पंचवीस सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन रविवारी अनंतचतुर्दशीला होणार आहे. घोलवड पोलीस ठाण्याअंतर्गत दहा मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्यामध्ये घोलवड गावातील तीन, रामपूर व झाईतील प्रत्येकी दोन तर बोर्डी, चिखले आणि वेवजी गावातून प्रत्येकी एका सार्वजनिक गणेश मूर्तीचा समावेश आहे. वेवजी वगळता सर्व मूर्तींचे विसर्जन अरबी समुद्रात करण्यात येईल. त्यामुळे डहाणू बोर्डी या प्रमुख राज्य मार्गावर वाहतूक तसेच शांतता व सुव्यवस्थेकरिता बंदोबस्त ठेवण्यात येईल. यावेळी पारंपरिक भजन-कीर्तन आणि बेंजो तसेच म्युझीक सिस्टीमचा मिरवणुकीत वापर दिसून होईल. त्यामुळे वाद्य वजविणाºया स्थानिक पथकांना रोजगार मिळणार आहे. बाप्पांच्या मिरवणुकीसाठी वाहनं सजावटीचे काम रविवारी सकाळपासून हाती घेतले जाईल. विसर्जन घाटांवर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जीवरक्षकही तैनात करण्यात आले आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Vasai Virarवसई विरार