- अनिरुद्ध पाटीलबोर्डी : गणेशोत्सवाच्या काळात बाजारात केवड्याला वाढती मागणी असते व दरही चांगला मिळतो. त्यामुळे शिवारातील केवडा चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या चोरीला प्रतिकार केल्यास बन जाळणे तसेच बागायतीचे नुकसान करणे असे प्रकार होत असल्याने बळीराजाला ते सहन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.पन्नास रुपयाला घेतलेला केवडा व्यापारी बाजारात ५०० ते ७०० रुपयांना विकतात. व शेतकºयांचे शोषण करतात. समुद्रकिनारी तार व सिमेंट अथवा लोखंडी पोल खाºया हवेमुळे टिकाव धरत नसल्याने दोन-तीन वर्षातच हजारो रुपये वाया जातात. तथापि शिवाराला कुंपण म्हणून शेतकºयांनी ही बनं मोठ्या कष्टाने टिकवली आहेत. वर्षभर या बनाकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. मात्र गणेशोत्सवात केवड्याला असणाºया विक्रमी मागणीमुळे विरार आणि दादरच्या फुल बाजारात तसेच डहाणूच्या बाजारात या केवड्याचा बोलबाला असतो.लोकल ट्रेनच्या माध्यमातून शहरातील गृहसंकुलांमध्ये डोअर-टू-डोअर कडधान्य, फळे व पालेभाज्या इ. विक्री करणाºया महिला उत्सवकाळात केवड्याचीही विक्र ी करतात. व्यापारी त्यांच्याकडून कमी किमतीत खरेदी करून मोठा नफा कमावतात. मागील तीन-चार वर्षांपासून शहरातील भक्त वाट्टेल ती किंमत मोजून केवडा खरेदीला प्राधान्य देऊ लागल्याने हा व्यापारी डहाणू पर्यंत पोहचला असून स्थानिकांना हाताशी धरून न फुललेला केवड्याची (कोवळा गाभा) मागणी करू लागले आहेत. पैशाच्या मोहापाई काहीजण त्यास बळी पडले असून त्यांच्याकडून अक्षरश: या बनाची कत्तल सुरु झाली आहे. रात्री किंवा पहाटे ते तोड करण्यासाठी निघतात. त्यांना अटकाव केलाच, तर जीवाला धोकाही पोहचू शकतो. काही वेळा या माथेफिरूंकडून बनाला आग लावणे, शेतमालाचे नुकसान केले जाते.केवडा काढणी कष्टप्रदगोकुळाष्टमीनंतर केवडा काढण्याला सुरु वात होते. या काटेरी झुडपापर्यंत पोहचून गाभ्यातील केवड्याला नुकसान न पोहचवता धारदार शस्त्राने तो अलगद काढावा लागतो. त्याकरिता श्रम पडतात. मात्र त्या तुलनेत मिळणारा नफा अल्प असल्याने नवी पिढी या कडे लक्ष देत नाही.
केवडाचोरीचे प्रमाण वाढले, शेतकऱ्याचे शोषण; पैशांकरिीता बनांचे नुकसान, कच्चा गाभा जातोय तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 11:20 PM