मोखाडा : काँग्रेसचे जेष्ठ नेते व मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती बाळू महादू पाटील याचे ८५ व्या वर्षी आडोशी येथे मंगळवार रात्री ११.३० च्या सुमारास त्यांचे निधन झाले आहेअभ्यासू, हुशार, मुरबी, पक्षांशी एकनिष्ठ असलेले राजकारणी अशी त्यांची ओळख होती. मनमिळाऊ स्वभावाचे जेष्ठ नेतृत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे १९७० च्या अगोदर ते राजकारणात सक्रि य झाले होते. आय काँग्रेस पक्षाची खऱ्या अर्थाने त्यांनी तालुक्यात मुहूर्तमेढ रोवून घराघरात काँग्रेस पक्ष पोहचवला १९९५-९६ च्या दरम्यान मोखाडा पंचायत समितीच्या सभापतीपदी ते विराजमान झाले होते त्यांच्या कारकिर्दीत तालुक्यात मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास कामे करून आपला ठसा उमटवला असून जिल्ह्यात सर्वत्र त्यांचा दबदबा होता. शेवटच्या क्षणात पर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्यांच्या पश्चात त्यांना पत्नी मुले सून नातवंडे जावई असा परिवार आहे.गेल्या काही दिवासा पासून त्यांना मधूमेहाने ग्रासले होते. त्यांच्या अंत्यविधीला राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील भुसारा, सेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, काँग्रेसचे युवा नेते मिलिंद झोले, पत्रकार रविंद्र साळवे, वामन दिघा, रामदास कोरडे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांची श्रध्दांजली सभा २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी आयोजित केली आहे. (वार्ताहर)
माजी पं.स. सभापती बाळू पाटील यांचे निधन
By admin | Published: January 26, 2017 2:50 AM