शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

आमसभेत विकासाला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 3:09 AM

आदिवासी विकास विभागामार्फत कागदोपत्री बांधलेल्या विहिरींचा विषय कळीचा ठरला.

सुरेश काटे।तलासरी : बहुप्रतिक्षित आमसभा बुधवारी संपन्न झाली असेच म्हणावे लागेल. कारण विकासाच्या मद्यांवर चर्चा न होताच ती अटोपती घेतल्याने नागरिक नाराज झाले. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत कागदोपत्री बांधलेल्या विहिरींचा विषय कळीचा ठरला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार यावर कारवाईचे आदेश देण्यात आले असले तरी विविध ग्रामपंचायतीमध्ये झालेला घरकूल घोटाळा चर्चेला येऊ न दिल्याची मॅनेजमेंट सर्वांचाच लक्षात आली.सभेला सुरुवात होताच विविध खात्याच्या प्रमुखाची हजेरी घेता जास्त संख्येने खाते प्रमुख अनुपस्थित होते यावेळी नागरीक संतप्त झाले होते. आमसभेत आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, शिक्षण , कृषी , बी एस एन एल, वन विभाग, नगर पंचायत, पाणी पुरवठा, एकात्मिक बाल विकास प्रकल्प, मुख्यमंत्री सडक या विभागाचे विषय विशेष चर्चेला आले होते.आमसभेला आमदार पास्कल धनारे, गट विकास अधिकारी बी. एन. नाळे, तहसीलदार विशाल दौडकर, पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, सभापती संगीता डावरे, उपसभापती वनशा दुमाडा, मुख्याधिकारी सागर साळुंखे, नगराध्यक्ष स्मिता वळवी तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच प्रत्येक गावचे सरपंच, नागरीक उपस्थित होते.आदिवासी विकास विभाग मार्फत २००९ मध्ये लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विहिरी बांधून न देता अधिकाऱ्यांनी पूर्णत्वाचे दाखले देऊन आलेला निधी अधिकाºयांनी व ठेकेदाराने हडपला हे निदर्शनात आणून देताच अशावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच बाल विकास प्रकल्पात गेल्या वर्षी कपाट घोटाळा झाला त्याचा अहवाल गेल्या वर्षी पासून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या कडे कारवाई साठी पडून आहे त्या चा पाठपुरावा करण्याचे अध्यक्षांनी विभागप्रमुखाला सांगितले. शिक्षण विभागाने शाळा दुरु स्ती चे प्रस्ताव जिल्ह्याला पाठविले आहेत असे गट शिक्षण अधिकारी सदानंद जनाथे यांनी सांगताच विद्यार्थ्यांचे बळी पडल्यावर कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनते ने करताच पाठपुरावा करण्या विषयी सांगण्यात आले. तालुक्यात मुख्यमंत्री सडकची कामे निकृष्ट होत असल्याचे लोकांनी सांगितले. उधव्यात मोठ्या प्रमाणात स्फोटाचा वापर करून दगड उत्खनन केले जात असल्याचे तहसीलदार विशाल दौडकर यांच्या निदर्शनात आणून देताच कारवाईचे आश्वासन दिले. उधवा वन विभागाने सुत्रकार येथे २५८०० वृक्ष लागवड केल्याचे सांगताच एवढी वृक्ष लागवड होऊनही जंगले उजाड का हा प्रश्न जनतेने विचारताच आमदारा सह सगळ्यानी पाहणी करण्याचे ठरविले, कृषी विभाग लाभार्थ्यांना लाभ देताना विधवा महिलांचा प्राधान्याने विचार करीत नसल्याचे झाई बोरीगावाचे उप सरपंच अर्जुन वांगड यांनी सांगितलेतलासरी ची पाणी पुरवठा योजना तयार असून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाºयां च्या मनमानी मुळे लोकांना पाणी मिळत नाही एक महिन्यात फक्त २० नळ कनेक्शन दिले असताना विभागाचे अधिकारी आर. ऐ. पाटील यांनी काम प्रगती पथावर असल्याचे उत्तर दिले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायती मध्ये घरकुल घोटाळा असताना त्याचा विषय अधिकाºयांनी चर्चेला येऊ दिला नाही. तालुक्याच्या विकास संदर्भात आमसभा असताना अधिकारी मनमानी उत्तरे देत होत, यावरून अधिकाºयांवर कोणाचाही अंकुश नसल्याचे दिसून आले.जनता त्रस्त बाबू मस्तउपस्थितांनी आमसभेला जर अधिकारी उपस्थित राहत नसतील तर सभा बरखास्त करा असा आग्रह धरताच काही खात्याचे अधिकारी उपस्थित झाले. यावेळी गैरहजर अधिकाºयांवर कारवाईची मागणी करण्यात आली.महत्वाचे म्हणजे आमसभा भर दुपारी घेण्यात आल्याने अनेकांना त्रास झाला. तर काहींनी तेथे जाणे टाळले. एकीकडे अधिकाºयांची गैरहजेरी तर दुसरीकडे कडक उन्हाची वेळ याने तिस फटका बसला.

टॅग्स :Waterपाणी