राहुल वाडेकरविक्रमगड : या तालुक्यातील गणेशोत्सवात तरपा नृत्य, ढोल नाच व टीपरी नृत्य सध्या प्रचंड गाजते आहे. आदिवासी कला संस्कृतीचे एक वैशिष्टय असणाºया या कलेने डॉल्बी आणि डीजेची उणीव कुठेही जाणवू दिली नाही. प्रमुख लोकनृत्य म्हणून गेल्या अनेक वर्षापासून प्रसिध्द असलेला तारपा नाच व ढोल नाच तर टिपरीनृत्य सादर करुन उत्सवाची शोभा द्विगुणित केली जाते़ हे नृत्य शहरवासिंयासाठी मोठे आकर्षण ठरत असून ते बघण्यासाठी व शहरांमधील उत्सव, उद्घाटने, मंत्री, खासदार, आमदार यांच्या स्वागतार्थ सादर करण्यासाठी येथील आदिवासी कलाकांरांना निमंत्रित केले जाते.या भागात प्रामुख्याने या नृत्यांना प्रोत्साहन दिले जाते व त्याचे आवर्जून सादरीकरण केले जाते़ गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा सणांत आदिवासी आपल्या गाव-पाडयांत हे नृत्य सादर करीत असतात़ परंतु सध्याच्या आधुनिक युगात जरी या नृत्याला मागणी असली तरी त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे टिपरी व तरपा नृत्य सादर करणारें डोल्हारी येथील जेष्ठ कलाकार राहाणारे राजा गहला यांनी सांगीतले़ कारण हे नृत्य याच भागात प्रामुख्याने पाहावयास मिळते़ग्रामीण आदिवासी समाजामध्ये तारपा, लेझीम, गौरीनृत्य तसेच ढोलनाच, टिपरी नाच हे पारंपारिक लोकनृत्य प्रसिध्द आहेत़ काहीवेळा सणावारांच्या निमीत्ताने ती टी़ व्ही. चॅनल्सवर देखील दाखविण्यांत आलेली आहेत़ एखादा कार्यक्रम असेल तर तारपा, ढोल नाच याचे सादरीकरण करण्यासाठी आदिवासंींना बोलाविले जाते़ दुसरी आदिवासी कला वारली पेटिंग ही पेटिंग आज परदेशात सातासमुद्रापलिकडे पोहचली आहे़ मात्र ढोल नृत्य हे लोप पावत असतांना या भागात आदिवासी बांधव तर विक्रमगड तालुक्यातील उटावली, दादडे, डोल्हारी, तलवाडा आदिविध ग्रामपंचायत हददीतील जाणकार जेष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून त्याचे जतन करीत आहेत. या लोकनृत्यामध्य मनोरंजन असले तरी त्यातून मोठे मनोरे रचणे,कवायती सादर करुन अंधश्रध्दा निर्मूलन, शिक्षणाचा प्रसार ,भ्रष्टाचार निर्मूलन आदीबाबत याद्वारे जनजागृती केली जाते़ या पथकाने राज्यस्तरावरील महोत्सवात मालवण,सिंधुदुर्ग येथे ढोल नाच,लोकनृत्य सादर करुन पारितोषिक मिळविले आहे़ढोल नाच हा मिरवणुकीत सादर केला जातो. त्यात दोन ते तीन किमीचे अंतर कौशल्यपूर्ण कसरती करुन पार केले जाते. या कसरतीचे सुमारे २० वेगवेगळे प्रकार आहेत़ उटवली येथील महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे, सहारे, चौधरी, मोके, साठे आदी २५ कलाकार या नाचात सहभागी असतात़ परंतु शासनाने लोकनाटय तमाशाला जशी मान्यता दिली आहे़ त्याचप्रमाणे लोप पावणारी ही पारंपारिक नृत्यकला जपून ठेवणा-यांचा गौरव करावा व या कलेस मान्यता देऊन त्याची साधना व संवर्धन करणाºया कलावंतांना सांस्कृतिक विभागाकडुन अनुदान मिळावे अशी मागणीही या निमित्ताने होत आहे़ त्याचबरोबर तारपा नृत्याला देखील वाव मिळावा व ही कला जोपण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी मागणी या परिसरातील आदिवासी कलावंत आणि बांधव करीत आहेत.
आदिवासी नृत्यकलेच्या संवर्धनाची नितांत आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 1:42 AM