शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

बनावट कागदपत्रे आणि सीसीचा वसई तालुक्यात सुळसुळाट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 5:57 PM

वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी आणि कागदपत्रे, सरकारी बनावट स्टँप बनवून बांधकामे जोरदार सुरु असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा :- वसई विरार मनपाच्या कार्यक्षेत्रात बनावट सीसी आणि कागदपत्रे, सरकारी बनावट स्टँप बनवून बांधकामे जोरदार सुरु असल्याचे स्पष्ट झालेले आहे. वसई तालुक्यात बनावट सीसीचा सुळसुळाट कसा चालू आहे याबाबत विरार पोलीस ठाण्याला गुन्हा उघड झाल्यानंतर बांधकाम करणाऱ्या बिल्डरांमध्ये एकच खळबळ माजली आहे. या इमारतीत सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये बोगस सीसीचे गुन्हे दाखल झाले आहेत. बोगस सीसी बनवून इमारतींची बांधकामे करुन सर्व सामान्य ग्राहकांची फसवणूक करण्याचे वसई विरार परिसरात सरार्स प्रकार सुरु असल्याचे उघड झाले आहे.

मुंबईपासून अगदी जवळच असलेल्या आणि तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई तालुक्यात घरे घेणाऱ्या ग्राहकांची मागणी जोरदार असल्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी जोरदार बांधकामे सुरु केली. काही जणांनी आरक्षित जागेवर तर काहींनी बोगस सीसी, बनावट कागदपत्रे, बनावट स्टँप बनवून कामे धुमधडाक्यात सुरु केली. विरार पोलीस ठाण्यात बोगस कागदपत्रे आणि बनावट सीसीचे अनेक प्रकार उघडकीस आल्याने वसई विरार नाही तर मुंबईमध्येही खळबळ माजली होती.

दरम्यान, ५५ इमारतीच्या बोगस सीसीची प्रकरण चव्हाट्यावर आल्याने सदनिका खरेदीदारांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर आयुष्याची जमापुंजी गुंतवून या इमारतींमध्ये घर घेणार्‍या लोकांवरही टांगती तलावर लटकत आहे. या सर्व प्रकरणांमध्ये पालिका आयुक्त आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

१०० इमारतीचे गुन्हे दाखल करण्यास मनपाची टाळाटाळ

मागील मार्च महिन्यापासून विरार पोलिसांनी अश्याच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे उभारण्यात आलेल्या १०० इमारतीचे गुन्हे दाखल करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आले आहे. पण मनपाच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करत कानाडोळा केला जात आहे. विरार पोलिसांनी ५५ इमारत प्रकरणी पाच टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली आहे. 

१) आरोपींना वसई न्यायालयात मंगळवारी हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची काही या इमारतीत फसवणूक केली आहे का याचाही तपास केला जात आहे. - राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी)

१) ज्या बांधकाम व्यवसायिकाविरोधात बनावट कागदपत्रे, बोगस सीसी बनवून बांधकामे करत आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर परत त्याला किंवा त्यांच्या कंपनीला नगररचना विभाग आणि वसई विरार मनपाने यापुढे कुठेही बांधकाम करण्यासाठी परवानगी देऊ नये तेव्हा पुढे अशी प्रकरणे उघडून गरिबांची फसवणूक होणार नाही. - नरेंद्र बाईत (समाजसेवक)

2) वसई तालुक्यात सध्या बोगस सीसीचा सुळसुळाट सुरु आहे. यामुळे लाखो लोकांची फसवणूक होत असून अनेक बँका सुद्धा डुबल्या जाणार आहे. ज्यांच्यावर बोगस सीसीचे गुन्हे दाखल झाले आहेत त्यापैकी निम्मेच्यावर कार्यकर्ते हे पोस्टरवर फोटो लागणारे आहे. - प्रवीण गुरव

टॅग्स :nalasopara-acनालासोपारा