शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

वसईतील प्रसिद्ध फ्रान्सिस्कन चर्चची दुरवस्था, कमानीवरील दगड निखळण्याच्या स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 12:14 AM

वसईच्या रणवीर चिमाजी अप्पा किल्ल्यात असलेल्या १६ व्या शतकातील फ्रान्सिस्कन चर्चची दुरवस्था झाली आहे.

वसई : वसईच्या रणवीर चिमाजी अप्पा किल्ल्यात असलेल्या १६ व्या शतकातील फ्रान्सिस्कन चर्चची दुरवस्था झाली आहे. या चर्चमधील दगडी कमान धोकादायक झाली असून त्यातीत दगड निखळत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुरातत्त्व खात्याने तात्पुरती सोय म्हणून या कमानीबाहेर बांबूंचा अडथळा उभा केला आहे. दरम्यान, वसई किल्ल्यातील विविध ऐतिहासिक वास्तू सध्या मरणासन्न अवस्थेत असून त्यांचे संवर्धन करण्याची महत्त्वाची मागणी इतिहास व किल्लेप्रेमींनी केली आहे.वसईच्या रणवीर चिमाजी आप्पांच्या किल्ल्यात दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी हौशी पर्यटक, इतिहासप्रेमी आणि दुर्गप्रेमी नागरिक भेटी देत असतात. एका बाजूला असलेली वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला स्थानिक मच्छीमारांची वस्ती आणि विस्तीर्ण किनारपट्टी पाहण्यासाठी पर्यटकांची किल्ल्यात सतत रेलचेल असते. मात्र किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन अनेक दगडी बांधकामांना उतरती कळा लागली आहे. किल्ल्यातील फ्रान्सिस्कन चर्च येथे असलेल्या मुख्य कमानीचे पुरातन बांधकामातील वजनदार दगड निखळून कोसळण्याच्या अवस्थेत आहेत.फ्रान्सिस्कन चर्चच्या मुख्य कमानीतील १५० किलो वजनाचा दगड गेल्या वर्षी खाली कोसळला होता. या वेळी काही पर्यटक चर्चमध्ये होते. मात्र, कमानीखाली कोणी नव्हते. त्यामुळे केवळ सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. ज्या शिलालेखावर हा दगड पडला होता, त्या शिलालेखाला तडा गेला असून आता याच कमानीतील इतर दगडही निखळण्याच्या स्थितीत आहेत. एकूणच या संदर्भात सावधगिरीचा उपाय म्हणून पुरातत्त्व खात्याच्या कर्मचाऱ्यांनी या कमानीखाली जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला असून त्यांना कमानीबाहेरच रोखण्यासाठी तात्पुरता बांबूंचा अडथळा तयार केला आहे.पुरातत्त्व विभागाने या ठिकाणी ‘प्रवेश बंद’चा फलक लावून त्वरित या कमानीच्या संवर्धनाचे काम सुरू करावे आणि जे दगड निखळण्याच्या स्थितीत आले आहेत, त्यांच्यावर योग्य ते दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.यासंदर्भात पुरातत्त्व खात्याच्या वसई किल्ल्यातील कार्यालयाशी संपर्क साधला असता, संत फ्रन्सिस्कन चर्चची परिस्थिती धोकादायक आहे. यासाठी आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी पर्यटकांना धोक्याचा इशारा देणारे बॅनर लावले होते. मात्र, क्रिकेट खेळायला येणारी स्थानिक मुले बॅनरची नासधूस करतात. मात्र, आम्ही त्या ठिकाणी बांबूंचा अडथळा तयार करून पर्यटकांना कमानीखाली जाण्यास प्रतिबंध केला असल्याचे सांगितले. केवळ देशीच नव्हे तर विदेशी पर्यटकही आकर्षणापोटी या किल्ल्यात येतात. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने किल्ल्यातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्यावर उपाययोजना त्वरित करायला हवी.तातडीने लक्ष द्यावेवसई किल्ल्यातील जवळपास दहा बुरूज सध्या वड, पिंपळ, खजुराची झाडे, अनावश्यक काटेरी झुडुपे यांच्या विळख्यात बंदिस्त झाले असून ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.वसईचा किल्ला समस्त दुर्गप्रेमींचे आकर्षण आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंकडे पुरातत्त्व खात्याने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असे इतिहासकार डॉ. श्रीधर राऊत यांनी सांगितले. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार