शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

गाडीतून शेतकऱ्याचे तीन लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 11:11 PM

लुटण्याच्या सर्रास घटना : गुन्हा दाखल

मीरा रोड : बेकायदा शेअर भाडे घेणाºया खाजगी गाडीचालकांकडून आता प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. गुजरातहून आलेल्या एका शेतकºयाचे ३ लाख ३० हजार अशाच एका गाडीचालक व साथीदाराने लंपास केल्याचा गुन्हा काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

मीरा रोड रेल्वे स्थानक, भार्इंदरचे सावरकर चौक (गोल्डन नेस्ट), काशिमीरा नाका, वरसावे नाका आदी ठिकाणी वरील बसस्थानक परिसरातून काही गाडी चालक बेकायदा प्रवासी भाडे घेतात. मुंबई, ठाण्यासह वसई भागात हे चालक प्रवाशांना सोडतात. शेअर पध्दतीने चालणारी ही वाहतूक बेकायदा असली तरी प्रादेशिक परिवहन व वाहतूक पोलिसांच्या वरदहस्ताने ती राजरोस चालवली जाते. अशा भाडे नेणाºया गाडी चालकांकडून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडतात.

गुजरातच्या लिमडी तालुक्यातील शेतकरी किरण बुटिया (५५) हे मेव्हण्याची मुलगी मंजू व नात दिपीका हे बसने २३ डिसेंबर रोजी वरसावे नाका येथे उतरले. त्यांचा मुलगा ऐरोली येथे राहात असून चाळीत खोली घेण्यासाठी म्हणून ३ लाख ३० हजारांची रक्कम मुलाला देण्यासाठी बुटिया यांनी सोबत आणली होती. बससाठी थांबले असता तेथे एका गाडी चालकाने शेअर पध्दतीने कळवा नाका येथे सोडतो असे सांगितले. त्यानुसार ते तिघे गाडीत बसले. आधीच एक महिला त्यात बसली होती. नंतर आत जागा नसताना चालकाने त्याचा एक सहकारी मागच्या सीटमागील मोकळ्या जागेत बसवला. त्या ठिकाणी आधीच चालकाने बुटिया यांची पैसे ठेवलेली बॅग ठेवण्यास सांगितले होते.माजिवडा नाका येथे पोहताच चालकाने मला मालकाने तात्काळ बोरिवलीला बोलावल्याचे सांगून बुटिया आदींना खाली उतरवले. मागे बसलेला चालकाचा सहकारीही उतरून निघून गेला. चालकाने बॅग बुटिया यांच्या हातात देऊन निघून गेला. त्यांनी बॅग उघडली असता आतील रक्कम चोरीला गेली होती.

टॅग्स :mira roadमीरा रोडVasai Virarवसई विरार