- हुसेन मेमनजव्हार - जुन च्या दुस-या आठवड्यात पावसाची चाहुल लागताच मंगळवारी ११ जुन २०१९ रोजी शेतकरी वर्गाने खत खरेदी करीता शहरात खत विक्रेत्यांकडे खत व बियाणे खरेदी करीता गर्दी केली होती. जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुके हे आदिवासी तालुके असून येथील आदिवासी बांधवांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. लाखो हेक्टरमध्ये येथे भात, गहू, ज्वारी, बाजरी, नागली, खूरासनी वगैरे पीक येथील शेतकरी लावतात. या पिकांकरीता येथील जमीन उपयुक्त ठरते त्यामुळे पावसाळ्यापुर्वी येथे खत खरेदीकरीता मोठी झूंबड उडतांन दिसत आहे.जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांची भात बियाणे जास्त प्रमाणात खरेदी करतात, त्यात प्रामुख्याने इंद्रायणी, सुवर्णा, डांगी, कसबय, सोनम, राशीपुनम, पाच ऐकी, मुंद्रायणी, सह्याद्री ६८९, कर्जत ४ ते १२, गुजरात, हे बियाणे हळवा भात म्हणून खरेदी करतात, तर मसुरा, कसबय, कर्जत ४, सुमा, एक काडी, कोलम, हे बीयाणे गरवा भात म्हणून खरेदी करतात. हळवा भात म्हणजे लवकर पिकणारा भात आहे, हे पीक १०० ते १२० दिवसांत पिकते, आणि गरवा भाताला १५० ते १८५ दिवस लागतात त्यामुळे हळवा भात बायाण्याला चांगलीच मागणी आहे. हळवा भात बियाणे प्रति किलो ८५ ते १७५ पर्यत, तर गरवा भात बीयाणा २५ किलो पोती, ९८ ते १९५ या दराने बाजारात उपलब्ध आहे.याच बरोबर प्रामुख्याने या भागात नागलीचे पिक मोठ्याप्रमाणात येथील शेतकरी घेतात. या भागात आदिवासी बांधव हे आपल्या कुटूंबाना वर्षभर पुरेल इतकी पेरणी करून थोडाफार पिक विक्री करता बाजारात आणतात. तसेच, वरई (वरी) बीयाणांची चलतीही मोठ्याप्रमाणात होते. या पिकाला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकरी आप आपल्या आयपतीनुसार जागेच्या उपलब्धीनुसार पेरणी करून पिक घेतात.वरईची शेती ठरते नगदी शेतक-यांचा वाढता कलवरईला प्रोसेस करून भगर तयार करण्यात येते, तिला बाजारात जास्त मागणी असल्यामुळे ते नगदी ठरते. येथील शेतकरी वरईचे पीक मोठ्याप्रमाणात घेऊन उत्पन्नाचे स्त्रोत वाढवतात. प्रत्येक पीक घेण्यासाठी विविध प्रकाराचे खत व औषध शेतकºयांना लागत असते. पावसाळा जवळ आला की, खतांची खरेदी सुरू होते. परंतू पावसाळ्यापुर्वी खतांची मागणी जास्त असल्यामुळे भाव वाढ हाते, त्यामुळे शेतकºयांना वाढीव दराचा त्रास सोसावा लागत आहे.
जव्हारमध्ये बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:11 AM