शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

शेतकऱ्यांची ससेहोलपट

By admin | Published: February 18, 2017 4:56 AM

डहाणू तालुका पंचायत समिती कृषी विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवडा आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त दोन दिवस शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप

अनिरुद्ध पाटील / बोर्डीडहाणू तालुका पंचायत समिती कृषी विभागात कर्मचाऱ्यांच्या तुटवडा आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त दोन दिवस शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप केले जाते. मीटिंग आणि अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी अधिकारी पार पाडत असल्याने अनेकदा या दिवशी ही शेतकऱ्यांना रिकामी हाताने परतावे लागते. त्यामुळे बे भरवशी पावसाप्रमाणे या विभागाची स्थिती झाल्याची टीका संतप्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. नवीन जिल्हा निर्मिती नंतरही कार्यक्षम प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. डहाणू पंचायत समितीच्या कृषी विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. कृषी तसेच विस्तार अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन पदे व लेखनिक आणि शिपायाचे पदही रिक्त आहे. त्यामुळे आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरूवारी कृषी साहित्याचे वाटप केले जाते. नोंदणी तसेच वाटपाचे कार्य विस्तार अधिकारी करीत असून उर्वरित दिवशी त्यांना अन्य ग्रामपंचायतींमध्ये जाऊन प्रशासकांची भूमिकाही वठवावी लागते. हा तालुका हा आदिवासी बहुल असून कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतर अशा समस्यांनी ग्रस्त आहे. नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला असून कृषी क्षेत्रसंबंधीत विविध योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद केल्याचा गाजावाजा केला गेला. मात्र दिल्ली आणि गल्लीतील वास्तव भिन्न आहे. येथील लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचे सोयरेसुतक नाही. बांधकामाचा विकास निधी मंजूर करून तो पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून गटातटाचे राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्तरावरील लोकप्रतिनिधी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छ भारत व शौचालयांचा इष्टांक पूर्ण करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांना जुंपलेले आहे. त्यामुळे शेतकरी शासकीय लाभापासून वंचित असून देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. लोकसंख्या ४ लाख अनेक पदे रिक्तडहाणू तालुका पंचायत समितीअंतर्गत ८५ ग्रामपंचायतीत १७४ गावं सामावलेली असून सुमारे चारलक्ष लोकसंख्या आहे. तालुक्याच्या आदर्श आराखड्यानुसार ९६३ हेक्टर क्षेत्र असून सरासरी पर्जन्यमान १९१० मिमी आहे. खरीप हंगामात १५०० हेक्टरवर एकूण भात लागवड केली जाते. त्या पैकी हळवे २५५४, निमगरवे ९९०६ आणि गरवे २५४० क्षेत्र आहे. रब्बी हंगामात हरभरा ९३ हेक्टर, वाल ८० हेक्टर, भाजीपाला ७५० हेक्टर, फळझाडे १२८४५ हेक्टर क्षेत्रावर आहे.मात्र शेतकऱ्यांना पंचायत समिती कृषी विभागाशी निगडीत योजनांचा लाभ सुलभरित्या घेता येत नाही. त्यामुळे शेती अवजारे, कीटकनाशके व औषधांकरिता खाजगी दुकानात अधिक पैसे मोजावे लागतात. मागील पाच-सहा वर्षात या हंगामात मिरची लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले असून स्थानिकांचा कल शेतीकडे वळल्याने सकारात्मक चित्र आहे.